(Image Credit : dailymail.co.uk)
फिजिकल इंटिमसीबाबत महिला आणि पुरूषांचा दृष्टीकोन वेगवेगळा असू शकतो. असंही होऊ शकतं की, अनेकदा पत्नी फिजिकल इंटिमसीसाठी नकार देईल. पण अशा स्थितीत पतीने काय करावं? याबाबत फारच विचार करून निर्णय घ्यावा. कारण एक चुकीचं पाउल संपूर्ण नात्याला अडचणीत आणू शकतो.
फिजिकल इंटिमसी एका कपललाल शारीरिक आणि मानसिक रूपाने मजबूत करते. यासंबंधी करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं की, शारीरिक संबंधाबाबत महिला आणि पुरूषांचे विचार वेगवेगळे असतात.
काय सांगतो रिसर्च?
ज्यावेळी शारीरिक संबंधासाठी तुम्ही तयार असाल त्यावेळी पत्नी एखाद्या दुसऱ्या विचारात असू शकते. रिसर्चनुसार, सामान्यपणे महिला सायंकाळी शारीरिक संबंधाबाबत अधिक विचार करतात. तर पुरूष सकाळी फिजिकल इंटिमसीबाबत अधिक विचार करतात. त्यासोबतच जास्तीत जास्त कपल रात्री झोपण्याआधी किंवा ९ वाजतानंतर शारीरिक संबंध ठेवणं पसंत करतात.
अनेकदा पुरूषांची अशीही तक्रार असते की, जेव्हा त्यांना संबंध ठेवायचे असतात तेव्हा त्यांना पार्टनर नकार देते. याकारणाने त्यांच्यात अनेकदा तणाव वाढतो. अशा स्थितीत काय करू शकता याबाबत आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.
१) प्रेम व्यक्त करा
जर पत्नी फिजिकल इंटिमसीसाठी नकार देत असेल तर चिडू नका आणि फोर्सही करू नका. याउलट तुम्ही त्यांची स्थिती समजून घेऊन त्यांच्याकडे प्रेम व्यक्त करू शकता. त्यांना तुमच्या मूडची जाणीव करून देऊ शकता. तसेच त्यांना मिठी मारू शकता आणि प्रेमाच्या गप्पा करू शकता.
२) त्यांना आवडेल ते करा
जर तुमचा मूड फिजिकल इंटिमसीचा असेल, पण पत्नीने नकार दिला असेल तर अशावेळी तेच करा जे त्यांना पसंत असेल. जसे की, त्यांना जर फोरप्ले पसंत असेल तर तसं करा. फोरप्ले पार्टनरला शारीरिक संबंधासाठी तयार करण्यासाठी केला जातो. याने तुमची पार्टनर तुम्हाला नाहीच म्हणू शकणार नाही. हे करूनही नाही म्हटलं तर मग त्यांची समस्या समजून घ्या.
३) स्वार्थी बनू नका, त्यांच्या मनाचा विचार करा
शारीरिक संबंधावेळी अनेकदा पुरूष स्वार्थी होतात. यादरम्यान ते विचित्र हालचाली करू शकतात. पण हे लक्षात ठेवा की, त्यांची इच्छा नसतानाही तुम्ही पार्टनरसोबत काही केलं तर याने त्यांना मानसिक धक्काही बसू शकतो. त्यामुळे असं काही करू नका ज्याने त्यांना धक्का बसेल. त्याउलट तुम्ही त्यांना आराम करू दिला पाहिजे. त्यांना काही समस्या असेल तर त्याबाबत विचारलं पाहिजे.
४) मनातील बोला
जर शारीरिक संबंधासाठी पत्नी नकार देत असेल तर आधी त्यांचं मन समजून घ्या. त्यांनी नकार का दिला हे जाणून घ्या. त्याबाबत बोलू शकता. कुठे बाहेर जायचं असेल काही खायचं असेल तर त्यासाठी जाऊ शकता.
५) पहिल्यांदाच जवळ येत असल्याची जाणीव
जर काहीच समस्या नसेल आणि तरीही पार्टनर नकार देत असेल तर काय? तर प्रत्येक कपलसाठी पहिली रात्र सर्वात खास असते. कारण यात दोघेही पहिल्यांदा इतके जवळ येत असतात. त्यांना त्या पहिल्या त्या पहिल्या रात्रीची आठवण करून द्या. त्याबाबत गप्पा मारा. कदाचित त्यांचा नकार त्या मागे घेतील.
६) त्यांना वेळ द्या
फिजिकल इंटिमसी दुसरी असो वा तिसरी. प्रत्येकवेळी हे सोपं नसतं. फिजिकल इंटिमसी केवळ इंटिमेट होणं नाही तर त्याहूनही अधिक काही आहे. यावेळी केवळ शारीरिक नाही तर मानसिक रूपाने दोघे जवळ येत असतात. त्यामुळे घाई न करता किंवा त्यांच्यामागे न लागता त्यांना त्यांचा वेळ घेऊ द्या.
७) काहीतरी नवीन ट्राय करा
प्रत्येकवेळी फिजिकल इंटिमसीसाठी फिजिकल व्हायला पाहिजे असं काही नाही. यावेळी वेगवेगळ्या पद्धतींचा तुम्ही वापर करू शकता. नेहमी एकच एक गोष्टी करून कंटाळा आला असेल तर यावेळी वेगळं काही ट्राय करा.