साधारणपणे शारीरिक संबंधा ठेवायची वेळ कोणती असं जर सर्वसामान्यांना विचारलं तर कुणीही पटकन रात्र असं उत्तर देतील. मुळात तज्ज्ञ सांगतात की, शारीरिक संबंधाला वेळेचं बंधन ठेवू नये. म्हणजे त्यावेळ्या स्थितीनुसार वेळ ठरवावी. सिनेमात रात्री शारीरिक संबंध ठेवताना दाखवतात म्हणून तसंच असतं असं नाही. अनेक तज्ज्ञ शारीरिक संबंधासाठी पहाटेची वेळ सर्वात चांगली मानली जाते. याला काही वैज्ञानिक कारणेही आहेत.
तज्ज्ञही पहाटेच्या वेळी शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला देतात. अनेक कपल्सही त्यांच्या अनुभवातून असंच मानतात. मात्र हॉर्मोन एक्सपर्ट अलीसा विट्टी यांना असं अजिबात वाटत नाही. त्यांच्या मते शारीरिक संबंध ठेवण्याची सर्वात चांगली वेळ पहाटे नाही तर दुसरीच आहे.
हार्मोन्स एक्सपर्ट अलीसा यांनी डेली मेलला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आणि त्यातून संतुष्टी मिळवण्यासाठी सर्वात चांगली वेळ ही दुपारी ३ वाजता दरम्यानची असते. म्हणजे दुपारी ३ वाजता शारीरिक संबंध ठेवल्याने अधिक फायदा होतो. अलीसा यांच्यानुसार, यावेळी महिलांमध्ये कॉर्टिसोल हार्मोन्सचा स्तर सर्वात जास्त वाढलेला असतो.
कॉर्टिसोल हार्मोन स्ट्रेस कमी करून महिलांना अलर्ट ठेवण्यासाठी मदत करतो. दिवसा ३ वाजता या हार्मोनचा स्तर सर्वात जास्त असतो. त्यामुळे यादरम्यान महिला सर्वात जास्त एनर्जेटिक असतात.
अलीसा यांच्यानुसार, दिवसाच्या या वेळी महिला आणि पुरूष दोघांच्या कामुक भावना एकसारख्या असतात. आणि त्यामुळेच अशावेळी शारीरिक संबंध ठेवले तर परमोच्च आनंद मिळण्याची शक्यता जास्त असते.
मात्र, दुपारी ३ वाजता पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनचा स्तर कमी होतो. पण सेक्शुअल रिलेशनवेळी ते पार्टनरला भावनिक आधार देतात आणि गरजा पूर्णा करण्यास मदत करतात.