(Image Credit : bolde.com)
अनेक लोकांसोबत असं होतं की, त्यांनी एकदा शारीरिक संबंध ठेवल्यावर लगेच थोड्या वेळाने पुन्हा शारीरिक संबंध ठेवण्याची त्यांची इच्छा होते. मुळात कुणी किती वेळा शारीरिक संबंध ठेवावे याला काही बंधने किंवा नियम नाहीत. हे प्रत्येक व्यक्तीच्या शारीरिक रचनेनुसार आणि दोघांच्या मर्जीवर अवलंबून असतं. पण शारीरिक संबंधानंतर लगेच शरीरात जे केमिकल्स निर्माण होतात त्यामुळे तुम्हाला सेकंड राऊंड किंवा थर्ड राऊंड करण्याची इच्छा होते. चला जाणून घेऊ याची कारणे...
हार्मोन्स ओव्हरड्राइव्ह
(Image Credit : smh.com.au)
शारीरिक संबंधावेळी केवळ शारीरिकच नाही तर भावनिक अनुभवही सातव्या आसमानावर असतो. जेव्हा असं काही शरीर अनुभवतो ज्यात शरीराला संतुष्टी मिळते तेव्हा शरीर मेंदूला संकेत देतो की, अशाप्रकारचा अनुभव आणखी वाढवला जावा. पुन्हा केलं पाहिजे. असं होण्याचं कारण म्हणजे शारीरिक संबंधावेळी डोपामाइन आणि ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन्स रिलीज होतात. ज्यांनी आपल्याला आनंद मिळतो आणि तसंच पुन्हा करण्याची इच्छा जागृत होते.
शारीरिक संबंधानंतर मिळणारा आनंद
(Image Credit : insider.com)
जर पार्टनरसोबत तुमचा सेक्शुअल अॅक्ट चांगला राहिला असेल तर अर्थातच एका सेशननंतर तुमची दुसऱ्या सेशनची इच्छा होईल, तुम्हाला पुन्हा त्याच गोष्टीची ओढ वाटू लागेल, एक वेगळी अनुभूती होईल आणि या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला एक वेगळा हवाहवासा वाटणार आनंद मिळेल. एक चांगला सेक्शुअल अनुभव तुमचं नातं आणखी मजबूत करण्यास मदत करत असतो.
फर्स्ट राऊंडमध्ये ऑर्गॅज्म नाही झाल्यास
(Image Credit : pandagossips.com)
या गोष्टीची जास्त शक्यता राहते की, व्यक्ती शारीरिक संबंधाच्या पहिल्या राऊंडमध्ये उत्तेजित होता. पण त्याला ऑर्गॅज्मचा अनुभव आला नाही आणि त्यामुळे त्याला आणखी एक राऊंड करायचा आहे. जेणेकरून तो क्लायमॅक्सपर्यंत पोहोचू शकेल.
पहिल्या राऊंडनंतरचा स्ट्रॉंग इफेक्ट
सगळ्यांसोबतच असं होईल असं काही नाही. पण बऱ्याच लोकांसोबत असं होतं. काही लोकांना शारीरिक संबंधानंतर डिप्रेसिंग वाटू लागतं. कारण तुमच्या शरीराला वाटत असतं की, फील गुड अनुभव आणखी घेतला जावा. असं यामुळेही होतं कारण सेक्शुअल अॅक्टनंतर त्याचा आफ्टर इफेक्ट आणखी स्ट्रॉंग असतो.