लैंगिक जीवन उत्साहित आणि रोमांचक करण्यासाठी नवनवीन प्रयोग करणे आणि वेगवेगळ्या पोजिशन्स प्रत्येकालाच ट्राय करायच्या असतात. पण सगळं काही करूनही तुमच्या समस्यांचं समाधान होत नसेल तर अर्थातच एखाद्या एक्सपर्टची मदत घ्यावी लागते. असंच काही महिलांसोबत घड होतं. आता या महिला इंटरकोर्सऐवजी आउटरकोर्सचा आधार घेत आहेत. पण हे आउटरकोर्स नेमकं काय आहे? चला जाणून घेऊ....
काय आहे आउटरकोर्स?
तज्ज्ञांनुसार, इंटरकोर्स सोबतच आउटरकोर्सही लैंगिक जीवनाला रोमांचक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. इंडियाना युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सेक्शुअल हेल्थ प्रमोशनमध्ये एक रिसर्च केला गेला. ज्यातून समोर आलेले निष्कर्ष हैराण करणारे होते. रिसर्चमध्ये सहभागी जास्तीत जास्त महिलांना आउटरकोर्स काय आहे हे माहीत नव्हतं. पण साधारण १८.४ टक्के सहभागी महिलांनी इच्छा व्यक्त केली की, त्यांच्यासाठी केवळ इंटरकोर्सने ऑर्गॅज्म मिळवणं सोपं नव्हतं आणि त्यांना आणखी कशाची तरी गरज होती.
नॉन पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल अॅक्टिविटी
या रिसर्चमध्ये १८ ते ९४ वयोगटातील १ हजार ५५ महिलांना सहभागी करून घेण्यात आलं होतं आणि महिलांना ऑर्गॅज्मचा अनुभव मिळवण्यासाठी ज्या आणखी काहीची गरज असते, त्याला आउटरकोर्स असं नाव देण्यात आलंय. याचा अर्थ हा आहे की, नॉन-पेनिट्रेटिव्ह सेक्शुअल अॅक्टिविटी.
फोरप्ले आणि आउटरकोर्समधील फरक
फोरप्लेबाबत सांगायचं तर अॅक्ट सुरू होण्याआधी फीमेल पार्टनरसोबत कडल करणे म्हणजे मिठी मारणे, किस करणे आणि टीज करणे अशा अॅक्टिविटींचा यात समावेश असतो. याचा अर्थ हा की, फोरप्ले इंटरकोर्सपर्यंत घेऊन जाण्याचं एक माध्यम आहे. पण आउटरकोर्स इंटरकोर्स न करताही एकट्याने ऑर्गॅज्म मिळवण्यासाठी पुरेसा आहे. उदाहरणार्थ जर एखाद्या महिलेला क्लिटरल स्टीमुलेशन किंवा व्हायब्रेटर वापरून ऑर्गॅज्मचा अनुभव मिळत असेल तर हा आउटरकोर्स आहे. अनेकदा पुरूषांनाही पेनिट्रेटिव संबंधाशिवायही ऑर्गॅज्मचा अनुभव मिळतो.
ऑर्गॅज्म मिळवण्याची पद्धत
रिसर्चमध्ये सहभागी साधारण ३६ टक्के महिलांनी सांगितले की, त्यांना इंटरकोर्स दरम्यान केवळ तेव्हाच ऑर्गॅज्म मिळतो, जेव्हा क्लिटरल स्टीमुलेशन होतं. पण ही बाब अनेक महिला पार्टनरपर्यंत पोहोचवू शकत नाही. एक्सपर्ट सांगतात की, महिलांच्या आनंदावर आणि संतुष्टीवर फार कमी लक्ष दिलं जातं. त्यामुळेच आउटरकोर्सच्या माध्यमातून ऑर्गॅज्म मिळवण्याबाबत फार कुणाला माहिती नाही.