तुम्हालाही कधी झोप किंवा शारीरिक संबंध यातील कोणता पर्याय निवडण्यात अडचण आली आहे. म्हणजे दोनपैकी काय निवडावं अशा प्रश्नात पडले आहात का? असाल तर ही समस्या होणारे तुम्ही एकटेच नाहीत. एका सर्व्हेनुसार, साधारण ८० टक्के लोक शारीरिक संबंधाऐवजी झोपेला पसंती देतात. तुम्हीही या अडचणीत असाल की, काय निवडावं? तर आम्ही तुमचा हा प्रश्न सोडवण्यात मदत करू.
झोप जास्त आणि शारीरिक संबंधास नकार?
जर तुम्ही रात्री पूर्ण झोप घेतली नाही तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी दिवसभर सुस्ती जाणवेल. तुमचं कामात अजिबातच लक्ष लागणार नाही. तसेच कमी झोप घेण्याने वजन वाढण्याचीही समस्या होते आणि सोबतच तुमची रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते. त्यामुळे शारीरिक संबंधाऐवजी झोपेची निवड करणे सामान्य बाब आहे.
शारीरिक संबंधाचे फायदे
पण एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्हाला जोडीदार असेल तर शारीरिक संबंध तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. याचे फायदेही अनेक आहेत. याने स्ट्रेस कमी होतो, कॅलरी बर्न होता, हृदय निरोगी राहतं आणि नातंही मजबूत होतं.
झोपेऐवजी शारीरिक संबंध
पण अजूनही हा प्रश्न कायम आहे की, झोप आणि शारीरिक संबंध यात चांगलं काय? काही तज्ज्ञ सांगतात की, दोन्हीही गोष्टी चांगल्या आणि महत्त्वाच्या आहेत. तर काहींच मत आहे की, जर तुम्ही तुमच्या लैंगिक जीवनात आनंद नसाल तर मेंदूला शांत करण्यासाठी थोडावेळ झोप घ्या. तसेच काही तज्ज्ञ सांगतात की, जर तुम्हाला पुरेशी झोप घ्यायला मिळत नसेल तर शारीरिक संबंध ठेवा. शारीरिक संबंध ठेवल्याने हॅपी हार्मोन्स रिलीज होतात आणि अनेकदा स्लीप थेरपीसाठीही शारीरिक संबंध ठेवले जातात. कारण शारीरिक संबंध ठेवल्याने चांगली झोप लागते.
शारीरिक संबंधाचं महत्त्व?
शारीरिक संबंध ठेवल्याने एका तासात ३०० कॅलरी बर्न होतात. साधारण इतक्याच कॅलरी ३० मिनिटांच्या वॉकमध्येही बर्न होतात. तसेच यामुळे शरीरात रक्तप्रवाह चांगला होतो. शरीरातील टॉक्सिन्स बाहेर निघतात. त्यासोबतच शारीरिक संबंधामुळे तुमच्या गुड आणि बॅड कोलेस्ट्रॉलमध्ये नियंत्रण ठेवलं जातं.