पती-पत्नीसाठी एक सुंदर आणि आनंद देणारा अनुभव म्हणजे शारीरिक संबंध. शारीरिक संबंधातून दोघेही एकमेकांना खूश करण्याचा प्रयत्न करत असतात. पण अनेकदा पुरुषांना असं वाटू शकतं की, अनेक प्रयत्न करुनही त्यांच्याकडून पत्नी खूश नाही किंवा संतुष्ट नाही. याची वेगवेगळी कारणे असू शकतात. त्यातीलच काही गोष्टी म्हणजे तुमच्या जोडीदाराला आवडणाऱ्या गोष्टी तुम्ही करत नसाल. काही अशा गोष्टी ज्या महिला आपल्या पतीला सांगण्यास घाबरतात किंवा त्यांना त्या सांगण्यात अडचण येत असेल. शारीरिक संबंधात केवळ दोन शरीरं जवळ येणंच नाही तर आणखीही काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. तज्ज्ञांनी खालीलप्रमाणे काही खास टिप्स सांगितल्या आहेत, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही लैंगिक जीवन आणखी चांगलं जगू शकता.
प्रेमाच्या गोष्टी
अनेकदा पत्नीसोबत प्रेमाच्या गोष्टी करुन तिला शारीरिक संबंधासाठी तयार केलं जाऊ शकतं. आराम करताना किंवा चालता फिरता पत्नीशी प्रेमाने बोलणे त्यांना वेगळाच आनंद देऊन जातात. पत्नीवर तुमचं किती प्रेम आहे हे तिला सांगा. याने तुमच्या लैंगिक जीवनात एक वेगळाच रंग भरला जाऊ शकतो. याने पत्नी केवळ शारीरिकच नाही तर मानसिक रुपाने तुमच्यासोबत असेल.
आनंद आणि अनुभव गरजेचा
पुरुष जीवनातील अनेक अडचणी आणि त्रासांना दूर ठेवून लैंगिक जीवनाला वेगळं ठेवून चालतात. महिलांसाठी हा अनुभव खास असतो. उत्साह आणि चांगला अनुभव नसेल तर लैंगिक सुखाचा खरा आनंद घेताच येणार नाही. ज्या दिवशी तुम्हाला शारीरिक संबंध ठेवायचे असतील त्या दिवशी चिडू नका, रागावू नका आनंदी रहा.
तृप्ती होणे गरजेचे नाही
अनेक पुरुषांना असं वाटत असतं की, एक चांगला पती तोच ठरतो जो जोडीदाराला शारीरिक संबंधातून तृप्ती मिळवून देईल. तृप्ती मिळवणे किंवा परमोच्च आनंद हा सर्वांनाच सुखावणारा क्षण असतो. मात्र प्रत्येकवेळी असे व्हावे हे गरजेचे नाही. अशात अनेक महिलांना पतीकडून किंवा स्वत:कडून दबावात असतात.
शारीरिक संबंधात मोकळेपणा
शारीरिक संबंध ही काही फार गंभीर प्रक्रिया नाहीये. अनेकजण याकडे गंभीरपणे बघतात. अशात ते लोक हसणे, प्रेम करणे, गोष्टी करणे आणि आनंद घेणे विसरतात. शांतपणे मोकळेपणाने आणि प्रेमाने संबंध ठेवल्यास यात तुम्हाला अधिक आनंद मिळवता येऊ शकतो.
शारीरिक संबंधानंतरसुद्धा प्रेम
काही महिलांची ही सतत तक्रार असते की, त्यांचा जोडीदार हा संभोग करुन झाल्यावर लगेच झोपतात. यात तथ्यही आहे कारण संभोगादरम्यान पुरुषांची इनड्रॉफिन लेव्हल खूप वाढते. सामान्य शब्दात सांगायचं तर वीर्यस्खलनानंतर पुरुषाची शक्ती कमी होते. पण महिलांमध्ये हे पटकन होत नाही. त्यांना या क्रियेतून बाहेर येण्यासाठी पुरुषांपेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे लगेच झोपणे किंवा दूर होणे चुकीचे ठरते.