हे तुम्हाला माहीत असायला हवं की, तुमचं रिलेशनशिप आणि तुमची लव्ह लाइफ प्रभावित करण्याला एक नाही तर अनेक गोष्टी कारणीभूत असतात. तुमच्या वर्कस्टाइलपासून ते तुमची झोपण्याची पद्धत सुद्धा तुमच्या नात्यावर प्रभाव टाकते. यासंबंधी वेगवेगळे रिसर्चही होत असतात. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आले की, रात्री उशीरा झोपणाऱ्या लोकांचं नातं फार जास्त टिकत नाही. सोबतच असे लोक त्यांच्या नात्याप्रति समर्पितही नसतात. चला जाणून घेऊ काय सांगतो रिसर्च.
युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोने हा रिसर्च केला असून या रिसर्चनुसार, जे लोक रात्री उशीरा झोपता आणि सकाळी उशीरा झोपेतून उठतात ते लवकर झोपणाऱ्यांच्या तुलनेत शारीरिक संबंध ठेवण्याबाबत जास्त आक्रमक असतात. हे लोक इतरांच्या तुलनेत जास्त फिलिकल रिलेशन ठेवतात. ज्यात ११० पुरूष आणि ९१ महिलांचा समावेश करण्यात आला होता. या रिसर्चच्या माध्यमातून असे समोर आले की, आपली झोपण्याची पद्धत आणि आपल्या सवयीचा आपल्या व्यवहारावर प्रभाव पडतो.
या रिसर्चमधून असा दावा करण्यात आला आहे की, उशीरा झोपणारे लोक शारीरिक संबंधाबाबत जेवढे आक्रामक असतात, ते त्यांच्या रिलेशनशिपबाबत तेवढेच बेजबाबदारपणे वागत असतात. त्यामुळे झोपण्याची ही पद्धत असणाऱ्या लोकांचं नातं फार जास्त टिकत नाही. तसेच हे लोक नात्याप्रति अधिक समर्पितही नसतात
तेच दुसरीकडे या रिसर्चमध्ये असं मानण्यात आलं आहे की, रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणारे लोक त्यांच्या रिलेशनशिपबाबत अधिक जबाबदार असतात. या लोकांचं लव्ह लाइफ आणि वैवाहिक जीवनही जास्त काल चालतं.
लैंगिक जीवन : ऐनवेळेला महिलांच्या 'या' चुकांमुळे होतो मूड ऑफ, नंतर पार्टनरलाच देतात मग दोष!