शारीरिक संबंधाबाबत महिला आणि पुरूषांमध्ये वेगवेगळे समज-गैरसमज असतात. यांमुळे त्यांच्या लैंगिक जीवनात तणाव निर्माण होतो. असाच एक गैरसमज आहे की, प्रसूतीनंतर महिलांना ऑर्गॅज्मपर्यंत पोहोचण्यात अडचण येते. पण तज्ज्ञ याला शारीरिक नाही तर मानसिक समस्या मानतात आणि त्यानुसारच यावर उपचार सांगतात.
काय असतो गैरसमज?
काही महिलांना असं वाटत असतं की, बाळाच्या जन्मानंतर त्यांना आधीसारखी संतुष्टी मिळत नाही. त्यांना वाटत असतं की, वजायना अवयावामध्ये सैलपणा आला आहे, ज्यामुळे त्या त्यांच्या पार्टनरला आधीसारखा आनंद देऊ शकत नाहीयेत.
हे आहे सत्य...
वजायना फारच लवचिक अवयव असतो. तसेच हा अवयव नैसर्गिक रूपाने प्रसरण पावतो आणि पुन्हा मूळ आकारात येतो. जेव्हाही एखादी महिला शारीरिक संबंधासाठी उत्तेजित होते, तेव्हा वजायना लुब्रिकेटेड(चिकट) होतो आणि आतील दोन तृतियांश भाग प्रसरण पावतो. त्यामुळे शारीरिक संबंधादरम्यान पुरूषांना असं वाटतं की, वजायनाचा हा भाग सैल आहे. पण मुळात असं काही झालेलं नसतं.
डिलिव्हरीनंतर
वजायनामध्ये सैलपणा येण्याचं दुसरं कारण बाळाचा जन्म मानला जातो. नॉर्मल डिलिव्हरीमध्ये बाळ याच मार्गे बाहेर येतं. ज्यामुळे वजायनाचं तोंड प्रसरण पावतं आणि ते सैल होऊ शकतं, असं काहींना वाटतं. पण असं फार कमी महिलांसोबत होतं. काही डॉक्टर्स या गोष्टीशी अजिबात सहमत नाहीत. वजायनाचं प्रसरण पावणं स्वाभाविक आहे. पण आधीचा सामान्य आकारही मिळवता येतो. बाळाच्या जन्मानंतर वजायनाला मूळ आकारात परत येण्यासाठी साधारण सहा महिन्यांचा कालावधी लागतो. एक गैरसमज असाही आहे की, जास्त शारीरिक संबंध ठेवल्यानेही वजायना हा अवयव सैल होतो. पण कितीही वेळा शारीरिक संबंध ठेवले तरी वजायना अवयवाच्या मांसपेशी मूळ रूपात येतात.
कपल्स करतात या गोष्टी
शारीरिक संबंधाबाबत कपल्समध्ये वेगवेगळे गैरसमज असतात. त्यामुळे त्यांना वाटत असतं की, वयाजना आकुंचन पावतो आणि ते पुन्हा आधीसारखा आनंद घेऊ शकतील. वजायनोप्लास्टी एक सर्जिकल पद्धत आहे, ज्यात वजायनातून अतिरिक्त लाइन्स काढून, याच्या चारही बाजूने मुलायम टिशूज आणि मांसपेशींना टाइट करून वजायनाचा सैलपणा दूर केला जाऊ शकतो. काही क्रीम्सही मिळतात, ज्यांचा प्रयोग केल्याने वजायना आकुंचन पावते. पण तज्ज्ञ या गोष्टी न करण्याचा किंवा वापरण्याचा सल्ला देतात. त्यांचं मत असतं की, सैलपणा वजायनाच्या मांसपेशी सैल झाल्यामुळे येतो. क्रीम्स तर त्या भागापर्यंत पोहोचूही शकत नाही.