(Image Credit : www.durgamathaastrologers.com)
कामवासनेची कमतरता किंवा कामेच्छा कमी असणे तुमच्या लैंगिक जीवनाला प्रभावित करते. सोबतच तुमचं पार्टनरसोबतचं नातंही याने अडचणीत येऊ शकतं. अनेकदा कामवासनेची कमतरता दूर करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज पडते. त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या शारीरिक समस्या आणि आजारांचाही सामना करावा लागतो. इथे आम्ही अशाच काही समस्यांबाबत सांगत आहोत, ज्यांमुळे व्यक्तीमधील कामवासना किंवा कामेच्छा कमी होते. तुम्हालाही यातील एखादी समस्या असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
१) तणाव
तणाव आजच्या आपल्या धावपळीच्या लाइफस्टाइलचा भाग बनला आहे. सकाळपासून सायंकाळपर्यंत धावपळ, ऑफिसमध्ये वाढलेला कामाचा ताण, आर्थिक समस्या, अवेळी खाणे-पिणे याचा प्रभाव थेट तणावाच्या रुपात दिसू लागतो. आरोग्यासोबतच याने तुमची कामेच्छाही प्रभावित होते.
२) अपुरी झोप
झोप आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. याचा प्रभाव आपल्या लैंगिक जीवनावरही पडतो. झोप कमी झाल्यास याने अनेकांना कामेच्छा कमी होण्याची समस्या होऊ शकते. कमी झोपेमुळे तुम्हाला सुस्त आणि कमजोर झाल्यासारखं वाटेल. यानेच हळूहळू तुमचे कामेच्छा कमी होऊ लागते. त्यामुळे दररोज किमान ७ तासांची झोप घेणे गरजेचे आहे.
३) वजन
लठ्ठ किंवा वजन वाढलेल्या व्यक्तींची कामेच्छा कमी होते. याचं कारण त्यांच्या फॅट सेल्स एस्ट्रोजेन(फिमेल हार्मोन) रिलीज करतात. याने त्यांचा लैंगिक कामेच्छा कमी होते. रोज एक्सरसाइज करणाऱ्या लोकांची कामेच्छा मजबूत असते.
४) हाय ब्लड प्रेशर
चांगल्या लैंगिक आरोग्यासाठी गुत्पांगामध्ये रक्तप्रवाह योग्यप्रकारे होणे गरजेचे आहे. पण हाय ब्लड प्रेशरसारख्या स्थितींमध्ये असं होत नाही. याकारणाने गुप्तांगाच्या भागात रक्तसंचार योग्य होत नाही. याने अनेकांची कामेच्छा कमी होते. याने गुप्तांगात कोरडेपणा आणि इरेक्टाइल डिस्फंक्शन यांसारख्या समस्या गंभीर होतात.