बेडरूमच्या बंद दरवाज्या मागे काय होतं? कपल्स शारीरिक संबंधाची सुरूवात कशी करतात? किंवा शारीरिक संबंधादरम्यान कपल्स काय बोलतात? या सगळ्याबाबत माहिती मिळवणे सोपे नाही. पण एका अभ्यासातून हेच जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला की, कोणत्या प्रकारच्या आवाजामुळे शारीरिक संबंधावेळी उत्तेजना वाढते.
ऑनलाइन डेटिंग एजन्सी सॉसी डेट्सने ५ हजार २४ यूजर्ससोबत एक सर्व्हे केला आणि त्यांच्या हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, लैंगिक क्रियेदरम्यान त्यांना काय ऐकायला आवडतं. डेटिंग एजन्सीने लोकांना विचारले की, असे कोणते शब्द किंवा आवाज आहेत, जे लैंगिक क्रियेदरम्यान वापरल्याने कोणत्याही कपल्सच्या लैंगिक जीवनात आणखी जास्त रोमांच येऊ शकतो.
'हा' आवाज आहे टॉपवर
सर्व्हेमध्ये सहभागी ९० टक्क्यांपेक्षा जास्त पुरूषांनी सांगितले की, मोनिंग (moaning) म्हणजे कण्हण्याचा आवाज ऐकल्यावर त्यांची उत्तेजना अधिक वाढते. तेच दुसरीकडे ७७ टक्के महिलांना सांगितले की, त्यांच्या जोडीदाराच्या कण्हण्याच्या आवाजाने त्यांचीही उत्तेजना वाढते आणि त्यांना चांगलं वाटतं.
दुसऱ्या क्रमांकावर काय?
सर्व्हेमध्ये सहभागी ७६ टक्के पुरूष आणि ७३ टक्के महिलांना मान्य केलं की, लैंगिक क्रियेदरम्यान जर त्यांचा जोडीदार डर्टी टॉक करत असेल तर त्यांना चांगलं वाटतं आणि यानेही त्यांची उत्तेजना वाढते. पण मुळात डर्टी टॉक सोपं नाही. कारण सेक्शुअल फ्रेजेजबाबत एक्सपर्ट होणे थोडं कठीण आहे. म्हणजेच कधी कधी याचे दुष्परिणामही भोगावे लागू शकतात.
तिसऱ्या क्रमांकावर काय?
या सर्व्हेनुसार, हेवी ब्रीदिंग म्हणजेच जोरजोरात श्वास घेणे ही गोष्ट एक्साइटमेंटचा संकेत देते आणि मोठा श्वास घेण्याचा आवाजाने ६० टक्के पुरूष आणि ४५ टक्के महिलांना लैंगिक क्रियेदरम्यान उत्तेजनेची जाणीव होते.