शारीरिक संबंध हा इतका मोठा विषय आहे की, तो जितका समजून घ्यावा तितका कमी आहे. पण जास्तीत जास्त लोक आजही याकडे कानाडोळा करतात किंवा यावर बोलण्यास लाजतात. आपल्या शरीरात दोन प्रकारच्या कामेच्छा असतात हे तुम्हाला माहीत आहे का? खरंतर ही गोष्ट फारच कमी लोकांना माहीत असावी की, आपली कामेच्छा दोन प्रकारची असते. एक आपल्या मेंदूत निर्माण होते तर दुसरी आपल्या शरीरात.
शरीर आणि मेंदूमध्ये ताळमेळ गरजेचा
मेंदूमध्ये होणाऱ्या सेक्स ड्राइव्ह म्हणजेच कामेच्छेला spontaneous desire म्हटलं जातं. याचा अर्थ स्वाभाविक इच्छा असा होतो. तर आपल्या शरीरात होणाऱ्या कामेच्छेला responsive desire म्हणजेच प्रतिक्रियाशील इच्छा म्हटलं जातं. विज्ञानानुसार, तुमच्यात शारीरिक संबंधाची इच्छा निर्माण होण्यासाठी शरीर आणि मेंदू यात सामंजस्य असणं गरजेचं असतं. पण फरक तेव्हा पडतो जेव्हा शरीरात होणारी इच्छा आणि मेंदूत निर्माण होणारी इच्छा वेगवेगळ्या वेळी निर्माण होते.
काय आहे स्वाभाविक इच्छा(spontaneous desire) ?
ही स्थिती एका मेंटल अलर्टप्रमाणे असते. उदाहरणार्थ जर तुम्ही ऑफिसमध्ये बसलेले असता किंवा काही काम करण्याची तयारी करत असता तेव्हा अचानक तुमच्या डोक्यात आज शारीरिक संबंध ठेवण्याचा विचार येतो. आणि तुम्हाला असं जाणवू लागतं की, आज तुम्हाला शारीरिक संबंधाची गरज आहे. अनेकदा अशाप्रकारची मानसिक उत्तेजना पॉर्न बघताना येते. एका रिसर्चनुसार, पुरूषांमध्ये स्वाभाविक कामेच्छा जी डोक्यात सर्वात पहिले येते ती महिलांच्या तुलनेत जास्त असते.
काय आहे प्रतिक्रियाशील इच्छा(responsive desire)?
जेव्हा मेंदूआधी शरीरात शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा उत्पन्न होते त्याला responsive desire म्हणजेच प्रतिक्रियाशील इच्छा म्हणतात. यादरम्यान पुरूषांना त्यांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये इरेक्शन झाल्याचं जाणवतं. तर महिलांच्याही प्रायव्हेट पार्टमध्ये काही संवेदनांची जाणीव होते. याचा अर्थ हा होतो की, मेंदू शारीरिक संबंधासाठी तयार होण्याआधीच शरीर त्याआधी तयार झालेलं असतं. पुरूषांमध्ये जिते
काहींमध्ये असते दोन्ही प्रकारची कामेच्छा
अनेक लोक असेही असतात जे कोणत्या एका नाही तर दोन्ही प्रकारच्या कामेच्छा कॅटेगरीत येतात. तर ज्या लोकांमध्ये प्रतिक्रियाशील इच्छा अधिक असते, त्यांची कामेच्छा लो असते. कारण त्यांना शारीरिक संबंधाची गरज आहे याची जाणीव होण्यासाठी शरीराला त्यांना संकेत द्यावा लागतो. तसेच अशा लोकांना उत्तेजनेसाठी फिजिकल स्टिम्यूलेशनची गरज असते.