शारीरिक संबंधाच्या वेगवेगळ्या फायद्यांबाबत तुम्ही नेहमीच ऐकत आणि वाचत असाल. शारीरिक संबंधाला एक कम्प्लिट एक्सरसाइज मानली जाते. याने तुमचं ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं, मूड चांगला राहतो, पार्टनरसोबत बॉंडिंग चांगलं होतं, वेदनांपासून सुटका मिळते वगैरे वगैरे. अशात नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, रोज नियमित शारीरिक संबंध ठेवण्याचं कनेक्शन चांगल्या स्मरणशक्तीसोबत आहे.
या रिसर्चमधून समोर आलं आहे की, ज्या महिला नियमित शारीरिक संबंध ठेवतात त्यांची स्मरणशक्ती चांगली राहिली. McGill यूनिव्हर्सिटीच्या ७८ महिलांनी या रिसर्चमध्ये सहभाग घेण्यासाठी सांगण्यात आले होते. या महिलांचं वय १८ ते २९ दरम्यानचं होतं. त्यांच्याशी काही शब्द आणि चेहरे आठवण्यासाठी सांगण्यात आलं. नंतर रिसर्चमधून असं आढळलं की, जास्त किंवा नियमित शारीरिक संबंध ठेवणाऱ्या महिलांनी जास्त शब्द लक्षात ठेवले.
अर्काइव्ह ऑफ सेक्शुअल बिहेविअरमध्ये हे निष्कर्ष प्रकाशित झाले. यात असं सांगण्यात आलं आहे की, सेक्शुअल इंटरकोर्सने हिप्पोकॅंपसच्या चारही बाजूने टिश्यूजची ग्रोथ वाढते. हिप्पोकॅंपस मेंदूचा तो भाग आहे, ज्याचं कनेक्शन मेमरी फंक्शनसोबत असतो.
असं असलं तरी हे स्पष्ट झालं नाही की, जर शारीरिक संबंध आणि हिप्पोकॅंपस यांचा थेट संबंध आहे. तर यात सहभाग घेणारे लोक केवळ शब्दच का लक्षात ठेवू शकले. ते चेहरा लक्षात का ठेवू शकले नाहीत. याचं असंही कारण आहे की, हिप्पोकॅंपस प्रत्येक प्रकारच्या स्मरणशक्तीसाठी जबाबदार नसतो.