अलिकडे फार जास्त प्रमाणात पुरूषांमध्ये वेगवेगळ्या लैंगिक समस्या बघायला मिळतात. पुरूषांमध्ये या लैंगिक समस्या लैंगिक जीवनात सक्रिय झाल्यावरही होऊ शकतात. पण या समस्या होण्याचा धोका वाढत्या वयासोबत अधिक वाढतो. पुरूषांमध्ये लैंगिक समस्या निर्माण होण्याची वेगवेगळी कारणे असतात. त्यातील एक कारण म्हणजे डिप्रेशन. लैंगिक संबंध ठेवू न शकल्याने अनेकदा पुरूषांच्या आत्मविश्वासावर वाईट प्रभाव पडू शकतो. मात्र, योग्य उपचार आणि जीवनशैलीत बदल केला तर या समस्या दूर होऊ शकतात. चला जाणून घेऊ काही प्रमुख लैंगिक समस्यांबाबत....
टेस्टोस्टेरॉन डेफिशिअन्सी सिंड्रोम
टेस्टोस्टेरॉन डेफिशिअन्सी सिंड्रोमला हायपोगोनाडिज्म असंही म्हणतात. याचा तुमच्या लैंगिक क्षमतेवर वाईट प्रभाव पडतो. सोबतच हाडांमध्ये, ऊर्जा स्तर, शारीरिक शक्ती आणि मूड यावरही नकारात्मक प्रभाव पडतो. या लैंगिक समस्यांचा उपचार टेस्टोस्टेरॉन रिप्लेसमेंट थेरपी द्वारे केला जातो. या थेरपीमध्ये औषधे, इंजेक्शन, इम्प्लाट्स, स्कीन पॅकेजच्या मदतीने शरीरातील टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढतं.
पेरोनिज डिजीज
या समस्येत पुरूषांचा प्रायव्हेट पार्ट एका बाजूने झुकलेला असतो. असं लिंगाच्या आतील भागात प्लाक(पेशींची परत) तयार झाल्याने होतं. लिंगाच्या आतील भागात अशी परत तयार होणं हे लिंगावर जखम झाल्यानेही होऊ शकतं. या समस्येने पीडित लोकांना लिंगात ताठरता आल्यावर वेदना होऊ लागतात. काही पुरूष ही समस्या असूनही लैंगिक संबंध ठेवू शकतात. तर काहींना याने फार त्रास होतो. ही समस्या अधिक वयाच्या लोकांमध्ये जास्त बघायला मिळते. पण काहीवेळी ही समस्या तरूणांमध्येही बघायला मिळते. यावर योग्य उपचार केल्यास समस्या दूर होते.
प्रोलोंग्ड इरेक्शन(दीर्घकाळ ताठरता)
प्रायव्हेट पार्टमध्ये ताठरता विना रक्तसंचार येत नाही. सामान्यपणे जेव्हा पुरूषांची शारीरिक संबंधाची इच्छा होते, तेव्हा प्रायव्हेट पार्टमधील रक्तसंचार वाढतो आणि प्रायव्हेट पार्टमध्ये ताठरता येते. ही ताठरता २ ते ४ तासांसाठीही राहू शकते. या मेडिकल कंडिशनला प्रायपिज्म असंही म्हटलं जातं. ही समस्या इरेक्टाइल डिस्फंक्शनच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांच्या साइड इफेक्टमुळेही होते. अशावेळी डॉक्टरांशी वेळीच संपर्क साधून योग्य ते उपचार घ्यायला हवे.