शारीरिक संबंध एक असा अनुभव आहे ज्यामुळे आत्मशांती तर मिळतेच सोबतच आरोग्यही चांगलं राहतं. त्यामुळे शारीरिक संबंध जीवनासाठी फार महत्त्वाचा आहे, पण अलिकडच्या लाइफस्टाइलमध्ये स्ट्रेस, टेन्शन आणि धावपळीने लैंगिक जीवनावर वाइट परिणाम होत आहेत. कपल्समध्ये लैंगिक क्षमता कमी होत आहे. सेक्स एक्सपर्ट्सकडे नेहमीच अशाप्रकारच्या अडचणी असलेले लोक प्रश्न घेऊन येतात.
सामान्यपणे महिलांमध्ये लैंगिक क्षमता म्हणजेच कामेच्छा अधिक असल्याचे मानले जाते. पण बदलत्या लाइफस्टाइलमुळे त्यांच्यातही लैंगिक क्षमता कमी होत असल्याचे बोलले जात आहे. मात्र तज्ज्ञांनुसार, खालील ४ पोषक तत्त्वांचा आहारात समावेश केला तर कामेच्छा वाढण्यास मदत होईल.
मॅग्नेशिअम
एनबीटीने दिलेल्या वृत्तानुसार, मॅग्नेशिअमने मसल्सना आराम मिळतो आणि याने क्रॅम्प्सपासून सुटका मिळण्यास मदत मिळते. डायटिशिअन सिंडी क्लिंगरनुसार, मॅग्नेशिअम इन्सुलिनचा स्तर नियंत्रित करून पीसीओडी दूर ठेवण्यास मदत करतं. त्यामुळे रोज मॅग्नेशिअम असलेल्या पदार्थांचं सेवन करावं. दररोज कमीत कमी ३२० मिलिग्रॅम मॅग्नेशिअम शरीरात जायला हवं. यात हिरव्या भाज्या, केळी, अवोकोडो अशी फळं, कडधान्य इत्यादींचा समावेश करा,
व्हिटॅमिन डी
शरीरात जर व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल याने केवळ हाडं कमजोर होतात असं नाही तर यीस्ट इन्फेक्शन, यूटीआय आणि व्हजायनामध्ये इन्फेक्शन होऊ शकतं. न्यू यॉर्कच्या इंटिग्रेटिव स्त्रीरोग तज्ञ अनीता सदाती यांच्यानुसार, व्हिटॅमिन डी एंटीमायक्रोबियल कंपाउंड्स cathelicidins च्या प्रॉडक्शनला रिवाइव्ह करतं.
फायबर
फायबर शरीरातून एस्ट्रोजनचं अधिक प्रमाण बाहेर काढण्यास मदत करतं. तसेच याने Premenstrual syndrome (PMS) सिंड्रोम कमी करण्यास आणि यूटर्स फायब्रॉइड्सला नष्ट करण्यासही मदत मिळते.
या पोषक तत्त्वांसोबतच डेली रूटीनमध्ये बदल करून लैंगिक क्षमता वाढवाऱ्या पदार्थांचं सेवन करून कामेच्छा वाढवू शकता. यासोबतच एक्सरसाइज आणि काही लोकांनी योगाभ्यास केला तर यानेही कामेच्छा वाढण्यास मदत होते.