(Image Credit : urjakit.com)
वैवाहिक जीवनात एक महत्त्वाचा भाग म्हणजे शारीरिक संबंध. यात तोचतोचपणा येऊ नये म्हणून तरूण कपल्स बेडरूममध्ये नवीन काही ट्राय करत असतात. अनेकदा नेहमी त्याच त्याच पद्धती वापरून कंटाळलेल्या कपल्सना लैगिक जीवनात नवा जोश भरण्यासाठी तज्ज्ञही वेगळं काही करण्याचा सल्ला देतात. पण नवीन पोजिशन ट्राय करताना काही गोष्टींची काळजी घेणं महत्वाचं ठरतं. नाही तर वेगळं काही करणं तुम्हाला जास्त महागात पडू शकतं. अशाच काही पोजिशन पॉर्न सिनेमात पाहून कपल्स खऱ्या आयुष्यातही ट्राय करतात, पण या पोजिशन त्यांच्यासाठी घातक ठरू शकतात. चला जाणून घेऊ कोणत्या आहेत या पोजिशन.....
पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टला इजा
काउगर्ल पोजिशन एक अशी पोजिशन आहे, ज्यात पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टला इजा होण्याचा धोका अधिक असतो. या पोजिशनला 'गर्ल ऑन द टॉप' पोजिशन असंही म्हटलं जातं. अनेक रिसर्चमधूनही या पोजिशनला पुरूषांसाठीची सर्वात घातक पोजिशन मानलं आहे. काही महिन्यांपूर्वीच एक रिसर्चमध्ये सांगण्यात आले होते की, पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये होणारे अर्धे फ्रॅक्चर हे काउगर्ल पोजिशनमुळेच होतात.
द पोगो स्टिक
शारीरिक संबंधाच्या या पोजिशनमध्ये इंटरकोर्सदरम्यान पुरूषांच्या गुडघ्यांवर अधिक दबाव पडतो. सोबतच महिला जोडीदाराचं संपूर्ण वजन पुरूष जोडीदाराच्या हातांवर असतं. अशा अवस्थेत इंटरकोर्सवेळी पुरूष जोडीदाराला जास्त प्रेशर लावावं लागतं, ज्यामुळे त्यांना कंबरदुखीसोबतच प्रायव्हेट पार्टमध्येही इजा होण्याचा धोका असतो.
द बॅलन्सिंग अॅक्ट
या पोजिशनदरम्यान पुरूष जोडीदाराचा त्यांच्या प्रायव्हेट पार्टवर कंट्रोल राहत नाही. कारण यादरम्यान सगळी धुरा ही महिला जोडीदाराच्या हाती असते. या स्थिती संपूर्ण कंट्रोल महिला जोडीदाराच्या हातात असतो आणि अनेकदा अधिक उत्साहात पुरूष जोडीदाराच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फ्रॅक्चरही येऊ शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या पोजिशन नक्की ट्राय करा, पण योग्य ती काळजी घेऊन. हवं तर तुम्ही याबाबत तज्ज्ञांचं मतही घेऊ शकता.