शारीरिक संबंधातून कपलला परमोच्च आनंद मिळतो खरा पण, या प्रोसेस दरम्यान पार्टनरकडून करण्यात केल्या गेलेल्या काही गोष्टींमुळे सगळा खेळ बिघडू शकतो. महिलांची एखादी गोष्ट पुरूषांना आवडली नाही तर त्यांना मूड ऑफ होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच ४ गोष्टी सांगणार आहोत. या गोष्टींची काळजी महिलांनी घेतली तर दोघांनाही परमोच्च आनंद मिळू शकतो.
अंधाराचा हट्ट
एका रिपोर्टनुसार, ज्या महिला शारीरिक संबंधावेळी पांघरूनात राहणं पसंत करतात किंवा ज्या महिला अंधारात इंटिमेट होण्यावर जोर देतात त्यांचे पार्टनर अशावेळी पूर्णपणे एन्जॉय करू शकत नाहीत. अशात होतं असं की, दोघांचं सेक्शुअल रिलेशन बिघडू शकतं. पुरूषांना कॉन्फिडेंट फीमेल पार्टनर अधिक पसंत असतात. अशा स्थितीत दोघांनी वेगळा पर्याया शोधावा.
एकच एक पद्धत
जर फीमेल पार्टनरला एक्सपरिमेंट पसंत नसेल आणि जवळ येण्यासाठी एकप्रकारचीच पद्धत वापरत असतील तर यानेही पुरूषांचा मूड खराब होऊ शकतो. शारीरिक संबंधासाठी वेगवेगळ्या पोजिशन असल्याने त्यांचा वापर करणं पुरूषांना आवडतं. अशात त्यांच्या पार्टनरने सुद्धा यात प्रतिसाद द्यावा असं त्यांना वाटत असतं.
खोटं ऑर्गॅज्म
गरजेचं नाही की, शारीरिक संबंधावेळी प्रत्येक महिलेला ऑर्गॅज्म होईलच. पण अशा स्थितीत काही महिला पार्टनरला खूश करण्यासाठी फेक ऑर्गॅज्मचा आधार घेतात. पण हे पार्टनरच्या लक्षात आलं तर याचा लैंगिक जीवनावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
शारीरिक संबंधाला पॉर्न समजणे
अनेक कपल्स असे असतात जे शारीरिक संबंधाला पॉर्न सिनेमाप्रमाणेच ट्रीट करतात. हे मान्य की, रफ आणि रिस्की शारीरिक संबंध कपल्सना पसंत असतात. पण गरजेचं नाही की, सगळ्यांनाच आवडेल. अशात दोघांनीही एकमेकांच्या आवडी-निवडीला महत्व दिलं पाहिजे.