(Image Credit : www.thebeaverton.com)
बाळाच्या जन्मानंतर पती-पत्नीचं नातं तर मजबूत होतं, पण त्यांच्या लैंगिक जीवनावर याचा फार वेगळ्या प्रकारे परिणाम होतो. बाळाचा सांभाळ आणि प्रसुतीतून पूर्णपणे बरं न होणं यामुळे जोडीदारांना शारीरिक संबंध ठेवणे शक्य नसतं. अशात पती किंवा पत्नी यांच्यापैकी एका व्यक्तीचं वागणं नकारात्मक झालं तर वैवाहिक जीवनात वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात. अशात परिस्थिती आणखी बिघण्याआधी पती-पत्नी यांच्यात या विषयावरुन संवाद व्हायला हवा. आम्हीही तुम्हाला बाळाच्या जन्मानंतर लैंगिक जीवनातील रस कायम ठेवण्यासाठी काय करावे, याबाबत तज्ज्ञांनी दिलेले काही सल्ले देत आहोत.
१) काही लोक असा विचार करतात की, बाळ होण्याआधी त्यांचं जीवन चांगलं होतं. पण हे ध्यानात घ्या की, हा सुद्धा तुमच्या जीवनाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. जुन्या गोष्टींचा विचार करुन हाती केवळ निराशाच लागेल. यातू बाहेर येण्यासाठी तुम्ही वर्तमानाला योग्य प्रकारे जगण्याचा प्रयत्न करा. मुलं हे तुमच्यात निर्माण होणारी भांडणे सोडवण्यास मदतच करतात, त्यांच्यामुळे भांडणं वाढत नाहीत. हे लक्षात घ्या की, घरातील आनंदाचं वातावरण हे लहान मुलांचं पालन पोषण करण्यास मदत करतं.
२) लहान मुलांना एकटं सोडून शारीरिक संबंध ठेवणे कोणत्याही जोडप्यासाठी कठिण काम आहे. पण पती-पत्नीच्या नात्यासाठी हे गरजेचंही आहे. त्यामुळे स्वत:साठी वेळ काढण्यासाठी तुम्ही घरातील नातेवाईकांची मदत घेऊ शकता. त्यांच्याकडे काही वेळासाठी मुलांना ठेवू शकता. याने तुम्हाला एकत्र राहण्यास आणि आधीसारखा अनुभव घेण्यास मदत होईल.
३) शारीरिक संबंध ठेवण्यास न मिळण्याचं कारण बाळाला ठरवू नका. इथे थोडी समजदारी दाखवा. अशात तुम्ही रात्रीऐवजी सकाळी शारीरिक संबंधाचा जास्त आनंद घेऊ शकता. तुम्ही तुमचं वेळापत्रक बाळाच्या दिनक्रमानुसार ठरवू शकता. याने तुम्हाला काही वेळ नक्कीच सोबत रहायला मिळेल. तुम्ही तुमच्या वेळेनुसार, त्याला त्रास होईल असं काही करु नका.
४) जर तुम्ही नोकरी करणारे असाल तर तुम्हाला एकत्र सोबत रहायला वेळ कमीच मिळत असेल. अशात तुम्ही फोनच्या किंवा मेसेजेसच्या माध्यमातून संपर्क करु शकता. या माध्यमातूनच तुम्ही तुमच्या भावना आणि प्रेम व्यक्त करु शकता.