लैंगिक जीवनात सतत एकसारख्याच गोष्टी करून अनेकांना कंटाळा आलेला असतो. याने दोघांमध्ये कामेच्छाही कमी होऊ शकते. अशात लैंगिक जीवनात नवा उत्साह, नवा जोश आणण्यासाठी काहीतरी वेगळं करत राहणं गरजेचं असतं. याने लैंगिक जीवनाचा नवेपणा टिकून राहतो. विवाहित जोडपी सेक्शुअल अॅक्टमध्ये इंटिमसी वाढवण्यासाठी वेगळ्या पद्धती शोधत असतात. तुम्हीही अशाच वेगळ्या ट्रिकच्या शोधात असाल तर ब्लाइंडफोल्ड सेक्स ट्राय करू शकता. याने तुम्हाला वेगळाच आनंद मिळण्यास मदत होईल.
यावर प्रसिद्ध सेस्कॉलॉजिस्ट डॉ. राजन भोसले यांनी सांगितले की, 'ही पद्धत किंवा आणखी कोणतीही पद्धत वापरा किंवा वापरू नका हे सांगणारे डॉक्टर कोण? मुळात असं काही करून दोघांना आनंद मिळणार असेल आणि यासाठी दोघांची सहमती असेल तर त्यात काहीच गैर नाही. पण एकाला ही बाब मान्य आणि एकाला नाही असं होऊ नये. तसेच असंच करूया किंवा तसंच करूया म्हणूण जबरदस्तीही करू नये. कारण याने दोघांनाही हवा तो आनंद मिळणार नाही. त्यामुळे हे करत असताना ते केवळ ब्लाइंडफोल्ड पुरतंच मर्यादीत राहिलं तर बरं होईल'.
ते सांगतात की, 'बऱ्याचदा दोघांपैकी एकाला एखादी गोष्ट आवडते तर दुसऱ्या ते चुकीचं वाटू शकतं. अशावेळी दोघांची सहमती महत्त्वाची ठरते. काही दोघांना त्रास होणार नसेल किंवा इजा होणार नसेल तर काहीही करायला हरकत नाही. जर दोघांपैकी एकालाही यातून त्रास होत असेल तर वेळीच थांबायला हवे'.
ब्लाइंडफोल्डचे फायदे
सेन्सची गती वाढते
ब्लाइंडफोल्ड म्हणजेच डोळ्यांवर पट्टी बांधल्यावर काहीच दिसत नाही. अशात काही दिसत नसल्याने व्यक्तीचे इतर सेंसेज वेगवान होतात. यामुळे पार्टनरचा प्रत्येक अॅक्ट किंवा साधं स्पर्श करणंही तुमची उत्तेजना वाढवणारं ठरू शकतं.
प्रत्येक स्टेपला सरप्राइज
ब्लाइंडफोल्डमुळे तुम्हाला काहीही दिसत नसतं, त्यामुळे पार्टनरची प्रत्येक स्टेप तुमच्यासाठी सरप्राइजसारखी असते. या भावनांमुळे मेंदूला एक्सायटमेंट वाटते. ज्याचा प्रभाव शरीरावर बघायला मिळतो.
लक्ष भरकटणार नाही
शारीरिक संबंधावेळी महिला पार्टनर एक्सायडेट नसणं याचं मुख्य कारण असतं त्या सतत दुसऱ्या गोष्टींचा विचार करत राहतात. ब्लाइंडफोल्डमुळे मेंदू केवळ पार्टनरच्या स्पर्शाकडे फोकस करेल. अशात लक्ष दुसरीकडे जात नाही.