लग्नानंतर जर लैंगिक जीवनच चांगलं नसलं तर नात्यावर काहीना काही प्रभाव पडतोच. त्यामुळे सुखी लैंगिक जीवनासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं असतं. पण अनेकांना ही काळजी घेणं म्हणजे काय हेच कळत नाही. खरंतर लैंगिक जीवन सुखी आणि उत्साही ठेवण्याचा उपाय तुमच्याच हाती असतो. यात सर्वात महत्त्वाचा भाग ठरते ती चांगली झोप. जर तुमची झोपच चांगली होत नसेल तर तुमचं लैंगिक जीवन विस्कळीत होऊ शकतं किंवा त्याचा तुम्ही हवा तसा आनंद घेऊ शकत नाहीत.
काय आहे झोपेचा आणि शारीरिक संबंधाचा संबंध
अनेक शोधांमधून हे समोर आलं आहे की, झोपेचा लैंगिक जीवनावर प्रभाव पडतो. २०१५ मध्ये आलेल्या जर्नल ऑफ सेक्शुअल मेडिसीनच्या शोधातून ही बाब समोर आली की, ज्या महिला रात्री एक तास जास्त झोपतात, त्यांच्या शारीरिक संबंध ठेवण्याची टक्केवारी कमी झोपणाऱ्या महिलांच्या १४ टक्के अधिक असते. म्हणजे तुम्ही जर तुमच्या झोपण्याचा कालावधी एका तासाने वाढवली तर तुम्ही तुमचं लैंगिक जीवन अधिक आनंददायी ठरतं.
चांगल्या झोपेने काय होतं?
तुम्ही स्वत: अनेकदा हे अनुभवलं असेल की, रात्री जर तुम्हाला चांगली झोप आली नाही. तर दुसऱ्या दिवशी तुम्ही किती तणावात असता. जर हे नेहमीच होत असेल तर विचार करा की, तुम्ही किती तणावात असाल.
तज्ज्ञ सांगतात की, झोपेचा प्रभाव मनावर खूप पडतो. झोपेचा मानसिक शांतीशी थेट संबंध आहे. जेव्हा तुम्ही भरपूर झोप घेता तेव्हा तुमचा तणाव कमी होतो आणि तुम्ही तुमच्या भावना नियंत्रित ठेवू शकता. चांगली झोप झाल्याने दुसऱ्या दिवशी येणाऱ्या तणावासाठी आणि दबावासाठी तुम्ही तयार असता.
चांगल्या झोपे हार्मोन्स नियंत्रित राहतात
चांगली झोप झाली नाही तर शरीरातील वेगवेगळ्या हार्मोन्सचं नियंत्रण बिघडतं. टेस्टोस्टेरोन नावाच्या हार्मोनचा झोपेशी थेट संबंध असतो. याच हार्मोनमुळे पुरुषांचं लैंगिक जीवन चांगलं राहतं. झोपेमुळे एस्ट्रोजन हार्मोनही प्रभावित होतात, शारीरिक संबंधासाठी हेच हार्मोन सर्वात महत्त्वाचे असतात.
एनर्जी आणि फोकस वाढवते झोप
जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारावर पूर्णपणे फोकस करु शकता त्यालाच परफेक्ट शारीरिक संबंध मानलं जातं. फोकस सोबतच चांगली एनर्जी सुद्धा शारीरिक संबंधासाठी महत्त्वाची मानली जाते. याने दोघांनाही परमोच्च आनंद मिळण्यास मदत होते.
जेव्हा तुमची झोप पूर्ण होत नाही तेव्हा तुम्ही थकलेले असल्याने शारीरिक संबंध ठेवताना पूर्ण आनंद मिळवू शकत नाही. झोपेने केवळ चांगल्या लैंगिक जीवनालाच फायदा होतो असे नाही तर तुमचं आरोग्यही चांगलं राहतं. तसेच त्वचाही चांगली राहते. त्यामुळे लैंगिक जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर दुसरे काही उपाय करण्याआधी चांगली झोप घेणे सुरु करा.