शारीरिक संबंध हा वैवाहिक जीवनाचा महत्वाचा भाग आहे. काही कपल्स यासाठी इतके उत्साही असतात की, योग्य माहिती न घेता वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करतात. अनेकदा वेगळेपणा म्हणून लोक पूल किंवा बीचवर लैंगिक क्रिया करण्यात मग्न होतात. मात्र, एक्सपर्टनुसार असं करणं महिलांच्या प्रायव्हेट पार्टसाठी घातक ठरू शकतं.
पाण्यात लैंगिक क्रिया
अनेकजण लैंगिक क्रिया रोमांचक करण्याच्या नादात पाण्यात लैंगिक क्रिया करतात. पण असं केल्याने तुम्हाला आनंद तर मिळणार नाहीच, पण पाण्यातील बॅक्टेरिया आणि इतर कीटाणूंमुळे इन्फेक्शन होऊ शकतं. तज्ज्ञ सांगतात की, जर कुणाला डायरिया किंवा संक्रमणामुळे कोणता आजार झाला असेल तर ती व्यक्ती पाण्यात गेल्याने पाण्यात इन्फेक्शन पसरू शकतं. अशा दुषित पाण्यात शारीरिक संबंध ठेवल्यास प्रायव्हेट पार्टचं नुकसान होऊ शकतं.
लुब्रिकेशन नाही, मजा नाही
तज्ज्ञांनुसार, पाण्यात लैंगिक क्रिया केल्याने नैसर्गिक लुब्रिकेशन नष्ट होतं. मुळात व्हजायनल लुब्रिकेशन सुद्धा पाणीच असतं आणि हे पाणी पूलमधील पाण्याच्या संपर्कात येतं तेव्हा नैसर्गिक लुब्रिकेशन नष्ट होतं. तज्ज्ञ सांगतात की, शारीरिक संबंधावेळी हे लुब्रिकेशन फार महत्त्वाचं असतं. खासकरून तेव्हा जेव्हा तुम्ही पाण्यात शारीरिक संबंध ठेवत असता. मात्र, हे लुब्रिकंट पाण्यात मिसळल्याने एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला इन्फेक्शनचा धोका अधिक असतो.
इरिटेशन आणि खाज
स्टेनफोर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये फीमेल सेक्शुअल मेडिसीन प्रोग्रामच्या निर्देशिका Leah Millheiser सांगतात की, समुद्र किनाऱ्यावर लैंगिक क्रिया केल्याने फीमेल प्रायव्हेट पार्टमध्ये वाळू जाऊ शकते. वाळूमुळे घर्षण निर्माण होऊ प्रायव्हेट पार्टमध्ये जखम होण्याचा धोका असतो. तसेच यामुळे इन्फेक्शनचा धोकाही असतो. तसेच यामुळे इरिटेशन आणि खाजही होते.
यूटीआयची समस्या
पाण्यात शारीरिक संबंध ठेवल्याने यूटीआयची समस्या सुद्धा होऊ शकते. याने महिलांची समस्या अधिक वाढू शकते. म्हणजे आनंदासाठी काहीतरी वेगळं करणं तुम्हाला महागात पडू शकतं. स्वीमिंग पूलमधील बॅक्टेरिया आत जाऊन याने यूटीआयची समस्या होऊ शकते.