ड्राय ऑर्गॅज्म ही समस्या पुरुषांना होत असते. नावावरुनच लक्षात येतं की, ड्राय ऑर्गॅज्ममध्ये परमोच्च आनंद मिळल्याची जाणीव तर होते, पण काही रिझल्ट मिळत नाही. म्हणजे वीर्य स्खलन होत नाही. याची दोन मुख्य कारणे सांगण्यात येतात पहिलं म्हणजे औषधांचा साइड इफेक्ट आणि दुसरं म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त वेळ लैंगिक क्रिया करणे.
यादरम्यान शरीरातून वीर्य फार जास्त गेलेलं असतं. जर लैंगिक क्रिया थांबवली नाही तर एका क्षणाला परमोच्च आनंद मिळाल्याची जाणीव होते, पण इजॅक्यूलेशन होत नाही. पुरुषांसाठी ही बाब भीती निर्माण करणारी आणि लाजिरवाणी ठरु शकते. पहिल्यांदा असं झाल्यावर अनेकजण घाबरतात. पण याला फार घाबरण्याचं कारण नाही. यावर उपचार शक्य आहे.
काय आहे उपचार?
याप्रकारची समस्या लक्षात येताच त्याचं कारण शोधा. अनेकदा लघवीमध्ये काही समस्या असेल आणि त्यासंबंधी काही औषधे घेत असाल तर ही समस्या येऊ शकते. पण जर जास्त लैंगिक क्रियेमुळे असे होत असेल तर काही वेळासाठी ब्रेक घ्यायला हवा. कारण ही समस्या आपोआप दूर होऊ शकते.
नात्यावर पडतो प्रभाव
ड्राय ऑर्गॅज्मचा थेट प्रभाव हा व्यक्तीच्या लैंगिक जीवनावर पडतो. इजॅक्यूलेशनच्या कमतरतेमुळे जोडीदारासमोर पुरुषाला लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागू शकतो. त्यासोबतच जर तुम्ही बाळाचं प्लॅनिंग करत असाल तर यातही तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते. एकंदर याचा तुमच्या नात्यावर वाईट प्रभाव पडतो.
काय करावे?
ड्राय ऑर्गॅज्मच्या समस्येबाबत जोडीदारासोबत मोकळेपणाने बोलावे. नेमकी काय अडचण आहे हे न घाबरता सांगावी. कारण ती व्यक्तीही तुमच्यासोबत यात जुळलेली असते. त्यामुळे दोघांनी मिळून यावर उपाय शोधला पाहिजे. जर असं केलं नाही तर आणि समोरच्या व्यक्तीला तुमची समस्या माहितीच नसेल तर नकळत समस्या वाढू शकते.
शारीरिक संबंधाची ठेवण्याचं प्रमाण वाढल्याने असे होत असेल तर जोडीदारासोबत बोलून काही दिवसांचा ब्रेक घ्यायला हवा. यादरम्यान चांगला आहार घ्या आणि जोडीदारासोबत चांगला टाइम स्पेंड करा. केवळ भावनात्मक जवळीकता बाळगा. पण जर ही समस्या का होत आहे याचं कारण कळत नसेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. कुणाच्या सांगण्यावरुन नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्या. यावरील उपचार फार जास्त काळ चालणारे नसतात. उपचारासोबत चांगला आहार सुरु ठेवा.