इरेक्टाइल डिस्फंक्शनही ही सामान्यपणे पुरूषांना होणारी समस्या आहे. यात शारीरिक संबंधादरम्यान यात एकतर इरेक्शन न होणे, ताठरता नसणे, काही लोक इरेक्शन कायम ठेवू न शकणे, काही सेकंदातच त्यांचं इरेक्शन होणे ही लक्षणे बघायला मिळतात. सामान्यपणे असं समजलं जातं की, ही समस्या ४० वयानंतर अधिक होते. पण तज्ज्ञ असं काही नसल्याचं सांगतात. कारण ही लक्षणे कोणत्याही वयातील पुरूषांमध्ये बघायला मिळू शकतात.
काय आहे ही समस्या?
सेक्सॉलॉजिस्ट डॉ. राजन भोसले यांनी सांगितले की, 'इरेक्टाइल डिस्फंक्शन हा काही आजार नाहीये. हे केवळ एक लक्षण आहे. त्यामुळे याकडे आजाराच्या दृष्टीने बघू नये. म्हणजे याला शारीरिक संबंधावेळी पुरूषाच्या गुप्तांगामध्ये ताठरेची कमतरता असं म्हणता येईल. शारीरिक संबंधासाठी उत्तेजित होऊनही पेनिसट्रेशनसाठी इरेक्शन न होणे आणि दोन्ही पार्टनर असंतुष्ट राहणे यालाही इरेक्टाइल डिस्फंक्शन म्हटलं जातं.
काय आहेत कारणे?
डॉ. भोसले यांनी सांगितले की, इरेक्टाइल डिस्फंक्शनची कारणे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी असू शकतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीमध्ये जर सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉनची निर्मितीच कमी होत असेल तर त्या व्यक्तीमध्ये हे लक्षण दिसू शकतं. त्यासोबतच मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये आणि शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यानेही ही समस्या होऊ शकते. या ढोबळ कारणांसोबतच एक मुख्य कारण म्हणजे मानसिक असतं. शारीरिक संबंध ठेवताना कशाप्रकारची भीती असणे, परफॉर्मन्सची भीती, जोडीदाराला संतुष्ट करू न शकण्याची भीती असणे हेही कारणे असू शकतात. त्यासोबतच शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोनचं प्रमाण फार कमी जास्त झालं आणि स्ट्रेस हार्मोन्स कॉर्टिसोलं प्रमाण फार वाढलं तर इरेक्टाइल डिस्फंक्शन ही समस्या वाढते.
काय आहे यावर उपाय?
डॉ. भोसले सांगतात की, या समस्येची लक्षणे आणि कारणे प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी असतात, इरेक्टाइल डिस्फंक्शन हा काही आजार नाही. त्यामुळे मुख्य कारणांचा शोध घेतला गेला तर यावर योग्य ते उपचार करता येतील. जेणेकरून तुम्ही लैंगिक जीवनाचा पूर्ण आनंद घेऊ शकला. त्यासाठी कुणी काय सांगतं यावर विश्वास न ठेवता थेट तज्ज्ञांचा सल्ला घेणे कधीही चांगले.