(Image Credit : midliferocksblog.com)
शारीरिक संबंधाबाबत आजही आपल्या समाजात वेगवेगळ्या धारणा आहेत. तरुण एकीकडे कमी वयातच शारीरिक संबंध ठेवत आहेत. तर दुसरीकडे लग्न झालेल्यांमध्ये याबाबत अरसिकता बघायला मिळत आहे. ऑफिसमधील बिझी शेड्युल, तणाव, टेक्नॉलॉजीचा जीवनातील वाढता वापर ही अशी कारणे आहेत, ज्यामुळे अनेकांच्या जीवनातील शारीरिक संबंधाचे क्षण कमी होत आहे. म्हणजे लोक याकडे कमी आकर्षित बघायला मिळत आहेत. सुरुवातीला शारीरिक संबंधात आलेली कमतरता जाणवते, पण लवकर यासोबत ताळमेळ बसवला जातो आणि नंतर हळूहळू यातून मन उठून जातं. चला जाणून फार जास्त काळासाठी तुम्ही शारीरिक संबंधातून ब्रेक घेतला तर काय होऊ शकतं.
विश्वास ढासळतो
जास्तीत जास्ती जोडप्यांच्या आयुष्यात शारीरिक संबंधात आलेली कमतरतेचा प्रभाव थेट त्यांच्या नात्यावर पडतो. याचा पहिला वार हा विश्वासावर होतो. नात्यात राहण्याचा आनंद, संतुष्टी आणि कुणाकडून प्रेम मिळण्याची भावना कमी कमी होत जाते. तज्ज्ञ सांगतात की, ज्या जोडीदारांमध्ये बिझी शेड्युल किंवा कामात व्यस्त असल्याने शारीरिक संबंध कमी होतो, त्यांच्यात आधी अपराधी भावना येते. पण नंतर हळूहळू त्यांच्यातील ही भावना नष्ट होऊन त्यांना ही बाब सामान्य वाटू लागते.
नातं येतं अडचणीत
तेच दुसरा जोडीदार याकडे सहानुभूतिपूर्वक बघू लागतो, पण नंतर त्याला किंवा तिला उपेक्षित केल्यासारखं वाटू लागतं. अशात जर लैंगिक जीवन आधीसारखं सुरळीत झालं नाही तर त्यात उदासीनता येऊ शकते. नंतर हळूहळू वेगवेगळी कारणे शोधून दोघांमध्ये भांडणे होऊ लागतात. हीच छोटी छोटी भांडणे दोघांमध्ये दरी निर्माण करण्याचं काम करतात.
तज्ज्ञांनुसार, ज्या जोडीदारांच्या आयुष्यात शारीरिक संबंधात कमतरता येते किंवा कमी वेळा ते जवळ येतात, त्यांच्यात ऑक्सिटोसिनसारखे बॉंडींग हार्मोन्सचं प्रमाण कमी होऊ लागलं. इतकेच नाही तर त्यांच्यात ही भितीही निर्माण होते की, आपला जोडीदार शारीरिक संबंधाची गरज पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या कुणाकडे तर आकर्षित होत नाहीये ना? त्यांच्यात संशयाची भावना निर्माण होते. पण हेही लक्ष देण्यासारखं आहे की, शारीरिक संबंध कमी ठेवत असलेली जोडपी असंतुष्ट असेल किंवा नाखूश असेल. शारीरिक संबंध ठेवायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही दुसऱ्या मार्गांनीही जोडीदारावर प्रेम व्यक्त करु शकता.
चिडचिड वाढते
चांगलं लैगिक जीवन आपलं मानसिक आरोग्य सामान्य ठेवण्यासाठी मदत करतं. एका स्कॉटिश अभ्यासानुसार, जे जोडीदार आठवड्यातून एक किंवा दोन वेळा शारीरिक संबंध ठेवतात, ते शारीरिक संबंधातून सन्यास घेणाऱ्यांच्या तुलनेत जास्त आनंदी असतात. शारीरिक संबंध ठेवताना मेंदूमध्ये फील गूड केमिकल्स रिलीज होतात. एन्डॉर्फिन आणि ऑक्सिटोसिन नावाचे हे केमिकल्स आपल्याला आनंद देतात. हा अंतर्गत आनंद आपल्या चेहऱ्यावरही दिसतो. तेच ज्या लोकांचं लैंगिक जीवन सुरळीत नसतं त्यांची चिडचिड अधिक वाढते. अशांना कारण नसताना फार लवकर रागही येतो.