शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
2
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
6
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
7
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
8
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
9
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
10
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
11
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
12
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
13
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
14
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
15
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
17
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
18
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
19
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
20
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया

लैंगिक जीवन : शारीरिक संबंध न ठेवल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 4:47 PM

Sexual health Tips: वैवाहिक जीवनात शारीरिक संबंध न ठेवणाऱ्या लोकांमध्ये नेहमीच शारीरिक आणि मानसिक रूपाने बदल बघायला मिळतात. चला जाणून घेऊन जे लोक शारीरिक संबंध ठेवत नाहीत त्यांच्यावर काय प्रभाव पडतो.

Sexual health Tips: शारीरिक संबंध ठेवणं ही वैवाहिक जीवनातील महत्वाची आणि सामान्य बाब आहे. पण हा विषय भारतात अजूनही हळू आवाजात आणि चोरून बोलण्याचा विषय आहे. याबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज किंवा संभ्रमही आहेत. लोकांना याबाबत बोलायचं नसतं. आपल्या देशात शारीरिक संबंध ठेवणं जमतं पण त्यावर  बोलणं जमत नाही. त्यामुळेच अनेकांना लैंगिक जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसे तर वैवाहिक जीवनात शारीरिक संबंध न ठेवणाऱ्या लोकांमध्ये नेहमीच शारीरिक आणि मानसिक रूपाने बदल बघायला मिळतात. चला जाणून घेऊन जे लोक शारीरिक संबंध ठेवत नाहीत त्यांच्यावर काय प्रभाव पडतो.

नात्यावर पडतो प्रभाव

वैवाहिक जीवनात कपल्सना आपलं नातं मजबूत करण्यासाठी नियमितपणे शारीरिक संबंध ठेवावा लागतो. दोघांच्याही सहमतीने नियमितपणे शारीरिक संबंध ठेवले तर दोघांची जवळीकता वाढते. नातं मजबूत होतं. भावनात्मकरित्या तुम्ही तुमच्या पार्टनरजवळ अधिक राहता. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : शारीरिक संबंध ठेवल्याने वजन वाढतं? जाणून घ्या तथ्य....)

जेव्हा तुम्ही अनेक दिवस शारीरिक संबंध ठेवत नाही किंवा ठेवतच नाही तर काय होतं? काही लोकांचे त्यांच्या पार्नरसोबतचे संबंध तणावपूर्ण होतात. ते एकमेकांशी जुळलेले आहेत असा विचार करणं बंद करतात. हे सगळ्यांसोबत होतं असं नाही. कारण काही लोकांना हे मान्य नसतं की, केवळ शारीरिक संबंध ठेवल्यानेच रिलेशनशिप चांगलं होतं.

तणाव वाढतो

शारीरिक संबंध ठेवल्याने शरीरात एंडोर्फिन आणि ऑक्सिटोसिन हार्मोन रिलीज होतात. हे न्यूरोकेमिकल्स चिंता किंवा तणावाची स्थिती निर्माण होण्यास रोखतात. तेच ऑक्सीटोसिनमुळे तुम्हाला चांगली झोप येते. जर तुम्ही नियमितपणे शारीरिक संबंध ठेवत नसाल तर तुमचं शरीर हे महत्वाचे हार्मोन कमी वेळा रिलीज करतील. ज्यामुळे तणावाचा सामना करावा लागू शकतो. (हे पण वाचा : लैंगिक जीवन : सतत पॉर्न बघितल्याने होऊ शकते 'ही' गंभीर समस्या, वेळीच व्हा सावध!)

इम्यूनिटीवरही पडतो प्रभाव

जर तुमचं लग्न झालं आहे आणि तुम्ही शारीरिक संबंध ठेवत नसाल तर याा तुमच्या इम्यूनिटी सिस्टीमवर प्रभाव पडत. जर तुमची इम्यूनिटी मजबूत असेल तर तुम्ही अनेक आजारांपासून बचाव करू शकता. पण तुम्ही काही कारण नसताना शारीरिक संबंध ठेवत नसाल तर तुमची इम्यूनिटी कमजोर होऊ शकते. काही रिसर्चमधून समोर आले आहे की, जेव्हा लोक शारीरिक संबंध ठेवतात तेव्हा शरीरात इम्यूनोग्लोबिन केमिकल वाढतं. याने आपलं शरीर अनेक रोगांसोबत लढू शकतं.

त्वचेवरही पडतो प्रभाव

जर तुम्ही शारीरिक संबंध ठेवत नसाल तर याचा फरक तुमच्या त्वचेवरही दिसतो. तुम्ही ऐकलं असेल की, शारीरिक संबंध ठेवल्याने त्वचा तजेलदार दिसते. शारीरिक संबंध ठेवल्याने शरीरात डोपामाइन हार्मोन रिलीज होतात. आणि यानेच आपली त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते.  

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship TipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिपHealth Tipsहेल्थ टिप्स