What is Sexomnia: सेक्सोमेनिया (Sexomnia) हा एक मानसिक आजार आहे. यात व्यक्तीला लैंगिक संबंधाबाबत एकप्रकारचं वेड लागलेलं असतं. प्रत्येकक्षणी शारीरिक संबंधांबाबत विचार करणे आणि त्याचा आनंद घेणे ही या आजाराची लक्षणे असतात. या आजाराला स्लीप सेक्स असेही म्हटले जाते. कारण या आजाराने ग्रस्त व्यक्ती हा झोपेतही याचा विचार करत असतो. सेक्सोमेनिया हा एक गंभीर मानसिक आजार असून याने चिडचिड, भीती, द्वेष आणि नकारात्मता येते.
सेक्सोमेनियामुळे पती-पत्नीचं नातं पूर्णपणे उद्ध्वस्त होतं. या आजाराने ग्रस्त व्यक्ती झोपेत बडबडणे, झोपेत चालणारे लोक यांच्याप्रमाणेच वागतात. पण ज्याप्रमाणे झोपेत चालणे आणि बडबड करणे दुसऱ्या दिवशी आठवत नाही. त्याचप्रमाणे सेक्सोमेनिया झालेल्यांना झोपेत शारीरिक संबंध ठेवणे नंतर स्मरणात राहत नाही.
सेस्कोमेनियाची लक्षणे
सेक्सोमेनियाची लक्षणे वेगवेगळी असू शकतात. जसे की, काही लोक झोपेत किंवा अंधारात शरीर हलवणे, विचित्र आवाजे काढणे असे करतात. अनेकदा हस्तमैथूनासोबत लैंगिक क्रियाही करु लागतात. पण त्यांना सकाळी यातलं काहीही लक्षात राहत नाही. झोपेत या लोकांना बौद्धिक समाधान न मिळाल्यास काही वेळा हे लोक हिंसकही होतात.
सेक्सोमेनिया धोकादायक
सेक्सोमेनिया या आजाराला कधीही दुर्लक्षित करु नये. कारण हा एक धोकादायक मानसिक आजार आहे. नकारात्मकता आणि संताप यामुळे हे लोक अनेकदा हिंसक होतात.
वेळीच तज्ज्ञांचा घ्या सल्ला
हा आजार पूर्णपणे मानसिक आजार आहे. महत्त्वाची गोष्टी या आजाराने ग्रस्त लोकांना त्यांना हा आजार असल्याचं कळत नाही. अशावेळी या लोकांच्या जोडीदारांनी तज्ज्ञांची भेट घ्यावी आणि आपल्या जोडीदारालाही याबाबत सांगावं. सुरुवातीलाच या आजाराची लक्षणे समजून आली तर वेळीच यावर उपाय करता येऊ शकतील.