ऐकायला हे नवीन आणि विचित्रही वाटत असेल पण स्लीप ऑर्गॅज्म लैंगिक जीवनातील एक सत्य आहे. जेव्हा मुलांमध्ये हे होतं तेव्हा त्याला वेट ड्रीम्स किंवा स्वप्नदोष म्हटलं जातं. पण जेव्हा हे महिलांमध्ये होतं तेव्हा याला स्लीप ऑर्गॅज्म म्हटलं जातं. आता तुम्ही विचार करत असाल की, हे नेमकं काय आहे? ही स्थिती ती असते ज्यात व्यक्ती झोपेतच क्लायमॅक्सचा अनुभव घेतात आणि त्याचवेळी झोपेतून जागे होतात.
फिजिकल ऑर्गॅज्मच स्लीप ऑर्गॅज्म
खरंतर हा प्रश्न हाच आहे की, स्लीप ऑर्गॅज्म खरंच काय आहे? तज्ज्ञ सांगतात की, स्लीप ऑर्गॅज्म मुळात फिजिकल ऑर्गॅज्मच असतो. या गोष्टीचा अनुभव करणारे जास्तीत जास्त लोक हे झोपेतून जागे झाल्यावरही इरॉटिक स्वप्नाला चांगल्याप्रकारे आठवू शकतात. पण महिलांकडे स्लीप ऑर्गॅज्मचा काहीच पुरावा नसतो, त्यामुळे हा अनुभव समजून घेणे त्यांच्यासाठी कन्फ्यूजिंग होऊ शकतं. पण याचा अनुभव तुम्हाला आला असेल तर तुम्ही हे सांगू शकता की, ते केवळ एक स्वप्न होतं की खरंच क्लायमॅक्सचा आनंद घेतला.
शरीरात होतात बदल
सेक्स रिसर्च नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित १९८६ मधील एका अभ्यासानुसार, साधारण ३७ टक्के महिला अशा असतात ज्यांना त्यांच्या आयुष्यात कमीत कमी एकदा स्लीप ऑर्गॅज्मचा अनुभव येतो. १९८३ मध्ये अभ्यासकांनी काही अशा महिलांचा अभ्यास केला ज्यांना झोपेत ऑर्गॅज्मचा अनुभव आला असेल. अशा महिलांच्या शरीरात काही फिजिओलॉजिकल बदल बघायला मिळाले.
यावर जास्त संशोधन नाही
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, अशा अनेक महिला आहेत ज्यांना प्रत्यक्षात ऑर्गॅज्मचा आनंद घेता येत नाही. पण त्या झोपेत ऑर्गॅज्मचा आनंद मिळवतात. असं होण्याचं कारण म्हणजे ऑर्गॅज्म दरम्यान शारीरिक उत्तेजनेसोबतच मानसिक उत्तेजनेचाही समावेश गरजेचा असतो. खरंतर या विषयावर फार जास्त रिसर्च करण्यात आलं नाही. कारण स्लीप ऑर्गॅज्म हा विषय असा नाहीये की, सहजपणे लॅबमध्ये त्यावर संशोधन केलं जाईल. खरंतर ज्यांनी कुणी याचा अनुभव घेतला असेल त्यालाच हे समजू शकतं की, स्लीप ऑर्गॅज्म पूर्णपणे अचानक आणि न कळता होतं.