रिलेशनशिपमध्ये जेव्हा विषय शारीरिक संबंधापर्यंत येऊन पोहोचतो तेव्हा याचा अर्थ होतो की, दोघांचाही एकमेकांवर पूर्ण विश्वास आहे. पण पुरूष नेहमीच ही तक्रार करताना दिसतात की, त्यांची पार्टनर त्यांच्यासोबत एका गोष्टीबाबत खोटं बोलत आहे. ती गोष्ट ऑर्गॅज्म. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, जास्तीत जास्त महिलांना परमोच्च आनंदाचा अनुभव मिळत नाही, पण त्या पार्टनरसमोर फेक ऑर्गॅज्म करतात. पण त्या असं का करतात?
महिलांच्या फेक ऑर्गॅज्मची वेगवेगळी कारणे असू शकतात. ज्यातील एक कारण म्हणजे मेल ईगो. महिलांना ही बाब माहीत असते की, पार्टनरला बेडमध्ये संतुष्टी मिळवून देण्याची गोष्ट पुरूषांना फार जिव्हारी लागते. त्यांना जर थेट सांगितलं गेलं तर ते हर्ट होऊ शकतात. त्यामुळे काही महिला फेक ऑर्गॅज्म करतात.
सहजता नसणे
काही महिला या ऑर्गॅज्मबाबत फार कन्फर्टेबल नसतात. ऑर्गॅज्मनंतरचं रिअॅक्शन त्यांचा पार्टनर कसा बघेल याची गोष्टींचा त्या विचार करू लागतात. त्यामुळेही त्यांना ऑर्गॅज्मचा अनुभव मिळत नाही आणि त्यांना ऑर्गॅज्मचा अनुभव झाल्याचं नाटक करावं लागतं.
मूड नसणे
अनेकदा महिलांची शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा नसते, पण पुरूष जोडीदाराची असते. अशात इच्छा नसतानाही शारीरिक संबंध ठेवल्यानेही महिला ऑर्गॅज्मच्या आनंदापासून वंचित राहतात. पण त्यांना पार्टनरला मूड अपसेट करायचा नसतो, त्यामुळे त्या खोट्याचा आधार घेतात.
नर्व्हस
असंही होऊ शकतं की, शारीरिक संबंधावेळी तुम्ही सहज असाल पण तुमची महिला पार्टनर नर्व्हस असू शकते. अशावेळी ना त्या शारीरिक संबंध एन्जॉय करू शकतील ना त्या ऑर्गॅज्मपर्यंत पोहोचू शकतील. पण शारीरिक संबंध पार्टनरला एन्जॉय करता यावेत म्हणून त्या आनंद होत असल्याचं आणि ऑर्गॅज्मचा अनुभव मिळाल्याचं खोटं भासवतात.
प्रेशर
अनेकदा शारीरिक संबंधादरम्यान पुरूष पार्टनर जेव्हा परमोच्च आनंदापर्यंच पोहोचणार असतात तेव्हा ते महिला पार्टनरला सुद्धा क्लायमॅक्ससाठी सांगतात, पण ऑर्गॅज्म अशी गोष्टी आहे जी कुणाच्या सांगण्यावरून होऊ शकत नाही. अशात महिलांकडेही प्रेशरमुळे फेक ऑर्गॅज्म करण्याव्यतिरिक्त काही पर्याय नसतो.