शारीरिक संबंधाने केवळ आनंद आणि आरामाच मिळतो असे नाही तर काही गोष्टींटी भीतीही यामुळे दूर होते. अनेक पुरूष आणि महिलांमध्ये शारीरिक संबंधाबाबत वेगवेगळ्या भीती असतात. खासकरून महिलांमध्ये शारीरिक संबंधावरून अनेक प्रकारच्या भीती असतात. त्यामुळे शारीरिक संबंधावेळी त्यांच्या मनात अनेक प्रश्न आणि विचार सुरू असतात. चला जाणून घेऊ महिलांच्या मनात काय असते भीती.
नग्न शरीर आवडलं नाही तर?
अनेक महिलांना पूर्णपणे नग्न होऊ शारीरिक संबंध ठेवण्यात सहजता वाटत नाही. काही महिलांच्या मनात भीती असते की, त्यांच्या पार्टनरला त्यांचं शरीर आकर्षक नाही वाटलं तर काय होईल? त्यांचा पार्टनर त्यांच्यावर तेवढंच प्रेम करेल की दूर जोईल? पण अशावेळी हे समजून घेणं गरजेचं असतं की, प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीना काही कमतरता असतेच. प्रेम हे केवळ शारीरिक नसतं. जर पार्टनरचं तुमच्या खरंच प्रेम असेल तर त्याला तुम्ही आकर्षक असाल-नसाल तरी काही फरक पडणार नाही.
प्रेग्नेंट झाली तर?
काही महिलांनी ठरवलेलं असतं की, त्यांना लगेच बाळ नकोय. त्यांनी काहीतरी प्लॅनिंग केलेलं असतं. त्यामुळे प्रेग्नेंट होण्याची भीतीही त्यांच्या मनात असते. आणि ही भीती मनात ठेवून त्या शारीरिक संबंध पूर्णपणे एन्जॉयही करू शकत नाहीत. पण कंडोमने तुम्ही तुमची ही भीती दूर करू शकता. जर योग्य पद्धतीने कंडोमचा वापर केला गेला तर प्रेग्नेंट राहण्याची शक्यता कमी राहील.
काही नवीन ट्राय केलं तर...
शारीरिक संबंधात जर पार्टनरने नवीन काही प्रयोग करण्याचा निर्णय घेतला तर काय होईल? कसं होईल? नाही म्हटलं तर पार्टनर नाराज होईल का? अशीही भीती अनेक महिलांच्या मनात असते. ही भीती असण्याचं कारण म्हणजे जास्तीत जास्त पुरूष हे शारीरिक संबंधावेळी त्यांच्या मनात येईल ते करतात आणि पार्टनरच्या इच्छांचा विचार करत नाहीत. यामुळेच महिला पार्टनरमध्ये असुरक्षा आणि भीती निर्माण होते.
नाही म्हटलं तर पार्टनर नाराज होईल का?
अनेकदा असं होतं की, महिला पार्टनरची शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा नसते. पण त्या हा विचार करून घाबरतात की, त्यांनी पार्टनरला नाही म्हटलं तर त्यांना वाईट वाटेल. अशात त्या इच्छा नसूनही होकार देतात. पण असं करणं चुकीचं आहे. दोघांनी याबाबत बोलायला हवं. नकार देण्यामागचं कारण स्पष्ट केलं तर पार्टनर नाराज होणार नाही.