जास्तीत जास्त पुरूष या टेन्शनमध्ये राहतात की, ते शारीरिक संबंध ठेवताना फार कमी वेळ टिकू शकतात. म्हणजे त्यांचं 'काम' लवकरच संपतं. अनेकदा महिला या गोष्टीने चिंतेत असतात की, त्यांचे पार्टनर जास्त वेळ टिकून राहू शकत नाहीत. ज्यामुळे त्यांना हवा तो आनंद मिळू शकत नाही. अशात एक मोठा प्रश्न समोर येतो तो म्हणेज आयडिअल सेक्शुअल ड्युरेशन असावं? एका रिसर्चमधून याच टायमिंगबाबत सांगण्यात आलं आहे.
४ हजार लोकांवर रिसर्च
अमेरिका आणि यूकेतील ४ हजार पुरूष आणि महिलांवर अमेरिकेतील एका वैज्ञानिकांच्या टिमने अभ्यास केला. या अभ्यासातून त्यांनी लोकांच्या लैंगिक सवयींबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. रिसर्चमध्ये सहभागी १८ ते ३५ वयोगटातील लैंगिक जीवनात सक्रिय असलेल्या लोकांना दोन प्रश्न विचारण्यात आले. एक असा की, ते किती वेळ टिकू शकतात आणि दुसरा हा की, त्यांना काय वाटतं, किती वेळ इंटरकोर्स चालावा?
महिलांचं काय होतं उत्तर?
या प्रश्नांवर मिळालेली उत्तरे हैराण करणारी होती. रिसर्चमध्ये सहभागी महिला म्हणाल्या की, त्यांच्यानुसार २५ मिनिटे ५१ सेकंद इतका वेळ शारीरिक संबंध चालावा. तेव्हाच त्यांना चांगलं वाटतं आणि संतुष्टी मिळते. तेच पुरूषांनी सांगितले की, त्यांच्यासाठी शारीरिक संबंधा आयडिअल वेळ हा २५ मिनिट ४३ सेकंद इतका आहे. म्हणजे आपल्या महिला पार्टनरपेक्षा काही सेकंद कमी.
पुरूष किती वेळ टिकतात?
रिसर्चमध्ये सहभागी जास्तीत जास्त महिलांची तक्रार ही होती की, त्यांचा पार्टनर शारीरिक संबंधावेळी सरासरी ११ ते १४ मिनिटेच टिकाव धरू शकतात. ज्यामुळे त्यांना हवा तो आनंद मिळू शकत नाही. रिसर्चमधील पुरूषांनी यावर सहमती दर्शवली. आणि म्हणाले की, वय आणि अनुभवानुसार हा कालावधी वाढवता येतो.
महिलांच्या आवडती वेळ कोणती?
सेक्शुअल इंटरकोर्सदरम्यान महिला आणि पुरूषांची कामेच्छा वेगवेगळी आढळते. पुरूष एकीकडे रात्रीच्या वेळी शारीरिक संबंध ठेवणं पसंत करतात तर दुसरीकडे महिलांना रात्री थकवा जाणवतो. रिसर्चमध्ये सहभागी महिलांनी हे सांगितले की, त्यांना सकाळी शारीरिक संबंध पसंत आहे.
दरम्यान, रिसर्चमध्ये हे सांगितलं गेलेली मते ही वैयक्तिक मते आहेत. तज्ज्ञ सांगतात की, शारीरिक संबंधाचा कालावधी हा त्या त्या व्यक्तीच्या शरीर रचनेनुसार आणि क्षमतेनुसार असतो. खूप जास्त कालावधी असणे म्हणजे जास्त आनंद असंही नसतं. कमी वेळातही तुम्ही अधिक आनंद मिळवू शकता. त्यामुळे कमी वेळातच सगळं काही होत असल्याने चिंता करण्याची गरज नाही. पण असं नेहमीच होत असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.