मालवण : आंगणेवाडी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीची बाब म्हणून जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १३ कोटी ६४ लाखांचा निधी मंजूर केला. रस्ता दुरुस्तीच्या कामांना कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नांमुळे मालवण-कसाल रस्त्याच्या विशेष दुरुस्तीसाठी ४ कोटी १२ लाख, झाराप - आयी (दोडामार्ग) ३ कोटी २१ लाख, चौके-कुडाळ १ कोटी ८६ लाख, मालवण-बेळणे २ कोटी ४९ लाख, ओझर कांदळगाव-मसुरे-बांदिवडे-आडवलीसाठी १ कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.आंगणेवाडी यात्रोत्सव व मुख्यमंत्री दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत मंजूर असलेले परंतु कार्यारंभ आदेश न मिळालेल्या रस्ता दुरुस्तीच्या कामांबाबत नाईक यांनी पालकमंत्री सामंत यांचे लक्ष वेधले होते.आंगणेवाडी यात्रोत्सवाच्या दृष्टीने रस्ता दुरुस्तीच्या या कामांबाबत उदय सामंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आदेशावरून रस्त्यांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.
रस्त्यांसाठी १३ कोटींचा निधी मंजूर : नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 1:41 PM
आंगणेवाडी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तातडीची बाब म्हणून जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी १३ कोटी ६४ लाखांचा निधी मंजूर केला. रस्ता दुरुस्तीच्या कामांना कार्यारंभ आदेशही देण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
ठळक मुद्देरस्त्यांसाठी १३ कोटींचा निधी मंजूर : नाईकआंगणेवाडी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाईक यांनी घेतला आढावा