शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

मालवण मध्ये १ लाख २४ हजाराची गोवा बनावटीची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:34 PM

liquor ban Sindhudurg : लॉकडाऊनचा फायदा उठवीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असलेल्या बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारू धंद्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून काल रात्री मालवण एसटी स्टँड मागील मुस्लिम मोहोल्ला येथे भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत १ लाख २३ हजार ६०० रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे.

ठळक मुद्देमालवण मध्ये १ लाख २४ हजाराची गोवा बनावटीची दारू जप्तउत्पादन शुल्कच्या भरारी पथकाची मालवण येथे रात्रीची करवाई

मालवण : लॉकडाऊनचा फायदा उठवीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असलेल्या बेकायदेशीर गोवा बनावटीच्या दारू धंद्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करण्यास सुरुवात केली असून काल रात्री मालवण एसटी स्टँड मागील मुस्लिम मोहोल्ला येथे भरारी पथकाने टाकलेल्या धाडीत १ लाख २३ हजार ६०० रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे.गेले काही दिवस गोवा बनावटीच्या दारूच्या वाहतूक व विक्रीचा सुळसुळाट सुरू असतानाच या कारवाईमुळे संबंधितांचे धाबे दणाणले आहेत. मालवण एसटी बस स्टँडच्या मागील मुस्लिम मोहल्ला परिसरातील एका घरात रोहन रजनीकांत पेंडूरकर नावाच्या व्यक्तीकडून गोवा बनावटीच्या दारूचा साठा विक्रीच्या उद्देशाने लपवून ठेवल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळताच उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक डॉ. बी.एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखालील भरारी पथकाने त्याठिकाणी अचानक धडक देत छापा टाकला.

या छाप्यात विविध ब्रँडच्या गोवा बनावटीच्या दारूचे १ लाख २३ हजार ६०० रुपये किंमतीचे एकूण १५ बॉक्स जप्त करण्यात आले. याप्रकरणी रोहन पेंडूरकर (वय ३२, रा. मुस्लिम मोहल्ला, वायरी मालवण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस. के. दळवी, दुय्यम निरीक्षक डी. एम. वायदंडे, जवान आर. जी. ठाकूर, डी. आर. वायदंडे, आर. एस. शिंदे आदी सहभागी झाले होते. या प्रकरणी अधिक तपास निरीक्षक एस. के. दळवी हे करत आहेत.

टॅग्स :liquor banदारूबंदीMalvan police stationमालवण पोलिस स्टेशनExcise Departmentउत्पादन शुल्क विभागsindhudurgसिंधुदुर्ग