शहरं
Join us  
Trending Stories
1
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
2
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
3
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
4
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
5
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
6
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
7
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
8
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
9
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
10
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
12
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
13
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
14
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
15
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
16
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
17
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
18
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ

सांडपाणी व्यवस्थापनात १00 ग्रामपंचायती सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्श ठरतील : रेश्मा सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 5:24 PM

सिंधुदुर्गनगरी : सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनात निवड झालेल्या १00 ग्रामपंचायतींनी आदर्शवत काम करुन त्याचा अन्य ग्रामपंचायतीना मॉडेल ठरतील असा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी केला.

सिंधुदुर्गनगरी  : सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनात निवड झालेल्या १00 ग्रामपंचायतींनी आदर्शवत काम करुन त्याचा अन्य ग्रामपंचायतीना मॉडेल ठरतील असा विश्वास जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी केला.ओरोस येथील शरद कृषि भवन येथे जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग विभागातर्गत सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सुरुवातीस या कार्यशाळेचे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि स्वच्छतेचे अग्रणी संत गाडगेबाबा महाराज यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा परिषद मुख्य कार्य अधिकारी शेखरसिंह उपस्थित होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्मा सावंत म्हणाले की, या कार्यशाळेस आज १00 ग्रामपंचायतीची निवड केली आहे. या ग्रामपंचायतीनी सांडपाणी व घनकचरा मध्ये अशी चांगली कामगिरी करा की, उर्वरीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर ग्राम पंचायती तुमचा मॉडेल म्हूणून आदर्श घेतील.या १00 ग्रामपंचायतीकडून संबंधित कार्यक्रमात चांगले काम करण्याचे आपली व प्रशासनाची अपेक्षा असून पुढील निवडणूक कार्यक्रम झाल्यानंतर उर्वरित ग्रामपंचायतीमधील सरपंच व ग्रामसेवक यांची कार्यशाळा घेऊन याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाबाबत कार्यक्रमाचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चौधरी यांनी या कार्यशाळेस जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतपैकी फक्त १00 ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. कारण या ग्रामपंचायतीवर प्रशासनाने त्यांच्या कामाबाबत विश्वास ठेवून निवड केली आहे. यावेळेस उपस्थित ग्रामसेवक व सरपंच यांचे अभिनंदन केले.नव्या उमेदीने पुर्ण वषार्चे प्लॅन तयार करुन गावपातळीवर लोकांचा बैठका घेऊन सांडपाणी व घनकचरा विल्हेवाटीचे नियोजन करावे. जसे सिंधुदुर्ग जिल्हा हा ODF+ मध्ये येण्यासाठी जशी कामे केली त्याचप्रमाणे सांडपाणी व घनकचरामध्ये करावे. आज आपण सांडपाणी व घनकचरा कार्यशाळेसाठी बाहेरचे तज्ञ मार्गदर्शक बोलविले त्याच प्रमाणे पुढच्या काळात आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बाहेरचे लोक आपल्या जिल्ह्यातील तज्ञांना बाहेरुन बोलविले पाहिजे.सांडपाणी व घनकचरासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करुन देण्याचेही म्हटले. जर जैविक कचरा वेगळा करुन त्याचे विल्हेवाटीचे नियोजनात त्यावर प्रक्रिया करणा-या, घरगुती सांडपाणीसाठी शोष खड्डा आणि कंपोशिष्टची सोय या महत्वाची तीन टप्पे पुर्ण करणा-या अशा ग्रामपंचायतीना जिल्हा अभियान राबवून भरीव रक्कम विकास कामासाठी पुरस्कार स्वरुपात देण्याबाबतची ग्वाही जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिलीयावेळेस शेखरसिंह मार्गदर्शन करताना म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा हागणदरी मुक्तीचे श्रेय हे सरपंच आणि ग्रामसेवकांना दिले. जिल्ह्यातील प्रभावी १00 ग्रामपंचायतीना सांडपाणी व घनकचरा याची संकल्पना सांगून त्यांना या बदल मार्गदशन करताना ते बोलत होते.यावेळी जसे सिंधुदुर्ग जिल्हा हा स्वच्छ भारत मिशन मध्ये प्रथम आला आहे हे सातत्य कायम टिकवून ठेवणे आवश्यक आहे. यासाठी आपला सहभाग हा अंत्यत महत्वाचा आहे. सांडपाणी व घनकचरा याबाबतचा दृष्टिकोन समजावून सांगितला. प्लास्टिकचा कमी वापर, पुर्नवापर आणि पुर्नर्वीकरण कशा प्रकारे करावा याबाबत मार्गदर्शन केले.प्लॉस्टिक वापरल्याने त्यांचे दुष्पपरिणाम कसे होतात याबाबत माहिती दिली. तसेच जिल्हा परिषदने समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रम, ग्रामपंचायत स्वच्छता, हात धुवा दिन, सुंदर गाव, उत्कर्षा किशोरीचा विकास सिंधुदुर्गचा या राबविलेल्या कामाची माहिती यावेळी दिली.सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन समजून सांगण्यासाठी मार्गदर्शक म्हणून डॉ. अमोल उबाळे, तांत्रिक सल्लागार, मनपा पुणे, श्रीमती. गौरी ठकार प्रायमुव्ह, पुणे आणि पाटोदा गावचे सरपंच भास्करराव पेरे पाटील, औरगांबाद यांनी केले. यावेळेस महिला बचत गट आंदुर्ले व पोईप यांनी सादरीकरण केले. यावेळी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनावर मार्गदर्शक ठरणा-या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.या कार्यशाळेस जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) सुनिल रेडकर, तालुक्यातील सर्व खातेप्रमुख, तालुक्याचे सर्व गट विकास अधिकारी, महिला बचत गट, ग्रामपंचायतीचे सर्व सरपंच, ग्रामसेवक आदि उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल बागल तर समारोप व आभार प्रदर्शन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.प) रणदिवे यांनी केले.