शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

१५, १६ प्रभागात विजयासाठी उमेदवारांची चुरस

By admin | Published: April 12, 2016 11:51 PM

कुडाळ नगरपंचायत निवडणूक : दोन्ही प्रभागात चौरंगी लढत होणार ; एमआयडीसी प्रभागात प्रकल्पग्रस्तांच्या समस्या--कुडाळ गावाकडून नगराकडे

रजनीकांत कदम --- कुडाळ नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमाक १५ मधली कुंभारवाडीमध्ये व प्रभाग क्रमाक १६ एमआयडीसी परिसरात चौरंगी व अटीतटीची लढत पहायला मिळणार असून प्रत्येक उमेदवाराकडून विजयासाठी जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. कुडाळ नगरपंचायतीचा प्रभाग क्रमाक १५ मधली कुंभारवाडी मध्ये मधली कुंभारवाडी, खालची कुंभारवाडी, इंद्रप्रस्थ नगर असा भाग येत असून या ठिकाणी ओबीसी महिला असे आरक्षण आहे. या प्रभागात एकूण मतदार संख्या ७८७ ऐवढी असुन पुरुष ४०७ तर महिला मतदार ३८० एवढे आहेत.मधली कुंभारवाडी या प्रभागातून सायली कुंभार (काँग्रेस), रसिका कुंभार (मनसे), सुप्रिया मांजरेकर (शिवसेना), विनिता कांबळी, (भाजप) असे चार महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मधली कुंभारवाडी व खालची कुंभारवाडी या प्रभागाची भौगौलिक रचना इतर प्रभागापेक्षा फार मोठी आहे. त्यामुळे येथील समस्या व प्रश्न देखील मोठे आहेत. या ठिकाणी असणाऱ्या रस्त्यांची दुर्दशा झालेली असून गटारेही गायब झाली आहेत. सांडपाणी व्यवस्था योग्य प्रकारे नाही. काही ठिकाणी पथदीप बंदावस्थेत आहेत. तर सार्वजनिक विहिरीच्या नूतनीकरणे करणे गरजेचे आहे. असे प्रश्न समस्या या प्रभागात मोठ्या प्रमाणात आहेत.त्याचप्रमाणे या ठिकाणी नळपाणी योजनाही येथील घराघरात पोहलेली नाही. तसेच विकासात्मक योजनाही पोहोचल्या नाहीत. खरे तर शिल्पकलेची देणगी असलेल्या या समाजाचा विकास जलद गतीने होण्याकरिता शासनाने काही चांगल्या योजना राबविण्याची गरज असून या करिता तेथील लोकप्रतिनिधींनीही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मधली कुंभारवाडी व एमआयडीसी परिसर प्रभागात काँग्रेस, शिवसेना, भाजप व मनसे या चार प्रमुख पक्षाच्या उमेदवारामध्ये लढत होत असून या ठिकाणी एकही अपक्ष उमेदवार नाही आहे. तर मधली कुंभारवाडी येथील उमेदवारांपैकी शिवसेनेच्या उमेदवार या त्या प्रभागाच्या तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य असून बाकीचे उमेदवार हे पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत. तर प्रभाग क्रमांक १६ एमआयडीसी परिसर मध्ये एमआयडीसी परीसर , वेंगुर्लेकर वाडी, कुंभारवाडी ह्या वाड्या समाविष्ट आहेत. या ठिकाणी खुला महिला प्रवर्ग असे आरक्षण असून या ठिकाणी एकूण मतदार संख्या ८२४ ऐवढी आहे. यामध्ये पुरूष ४३९ व महिला मतदार ३८४ आहेत. या एमआयडीसी परिसर प्रभागामध्ये ममता राणे (काँग्रेस), स्नेहा पावसकर (मनसे), प्रज्ञा राणे (शिवसेना), प्रज्ञा पाटकर (भाजप ) असे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या प्रभागामध्ये कुडाळ एमआयडीसीच्या परिसराचा प्रमुख भाग असून या ठिकाणी एमआयडीसी मध्ये जमिनी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या अनेक समस्या आहेत. तसेच नळपाणी व्यवस्था, ड्रेनेज व्यवस्था, रस्त्यांची दुर्दशा, बंदावस्थेतील पथदीप, गटारे अशा अनेक समस्या प्रश्न या प्रभागात आहेत. या एमआयडीसी प्रभागामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले उमेदवार हे पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत. या ठिकाणी अपक्ष कोणही उमेदवार नाही. मात्र काँग्रेस, भाजप, शिवसेना व मनसे या चार प्रमुख पक्षांचे उमेदवार असल्याने प्रत्येक राजकीय पक्षाच्या वतीने आपला उमेदवार विजयी होण्यासाठी सर्व प्रकारची प्रचार यंत्रणा राबविण्यात येणार असून या दोन्हीही प्रभागात मनसेने घेतलेली उडी कितपत यशस्वी होणार हे ही बघावे लागणार आहे.काहींना नाराजीला सामोरे जावे लागणारदोन्हीही प्रभागात सर्वच राजकीय पक्षाच्यावतीने अनेकजण ईच्छुक होते. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्याने काही ईच्छुकामध्ये नाराजीचा सुर आहे. त्याचा फटका येथील काही उमेदवारांना सहन करावा लागणार आहे.या मधली कुंभारवाडी प्रभागात मोठ्या प्रमाणात कुंभार समाज असून या समाज्याच्या सार्वजनिक स्मशानभूमीच्या जागे बाबतचा प्रश्न या ठिकाणी प्रामुख्याने आहे. या प्रश्ना बाबत येथील समाज बांधवांनी वेळोवेळी शासन दरबारी आवाज उठविला होता मात्र त्या प्रश्ना बाबत अजूनही योग्य ती उपाय योजना झालेली दिसत नाही.