रहिम दलाल- रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाडी इमारतींच्या बांधकामासाठी अनुदान असतानाही जमीन मिळत नसल्याने १५१२ अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत. त्यामुळे ३४९ अंगणवाड्या समाज मंदिर व सार्वजनिक ठिकाणी भरत आहेत.जिल्ह्यात ग्रामीण भागासाठी २८९५ अंगणवाड्या मंजूर असून, २८४१ अंगणवाड्या कार्यरत आहेत़ त्यामध्ये नियमित २२५६ व ५८५ मिनी अंगणवाड्यांचा समावेश आहे़ जिल्ह्यातील १५१२ अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत़ त्यामुळे काही अंगणवाड्या खासगी इमारतीमध्ये, प्राथमिक शाळेच्या खोलीमध्ये, तर काही अंगणवाड्या समाज मंदिरात व सार्वजनिक ठिकाणी भरवण्यात येतात़ या अंगणवाड्यांसाठी स्वत:च्या मालकीच्या इमारती असणे आवश्यक आहे़ त्यासाठी जिल्हा नियोजनमधून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध आहे़ मात्र, जागेअभावी इमारती कशा बांधणार, असा प्रश्न आहे़ सुरुवातीला अंगणवाडीसाठी ३ लाख ५० हजार रुपये देण्यात येत होते़ त्यामध्ये वाढ होऊन ४ लाख ५० हजार रुपये झाले़ त्यानंतर त्यामध्ये आणखी वाढ झाल्याने आता अंगणवाडीची इमारत बांधकामासाठी ६ लाख रुपये अनुदान देण्यात येते़ ज्या ३४१ अंगणवाड्यांच्या इमारती बांधण्यात आल्या होत्या, त्या प्रत्येक इमारतीसाठी ४ लाख ५० हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले होते़ जिल्ह्यात १५१२ अंगणवाड्यांना अजूनही स्वत:च्या मालकीच्या इमारती नाहीत. अनुदान उपलब्ध असतानाही केवळ जमीन मिळत नसल्याने मोठी अडचण होत आहे. या अंगणवाड्यांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नसल्याने ५८८ अंगणवाड्या खासगी इमारतींमध्ये भरवण्यात येतात. ५७५ अंगणवाड्यांनी प्राथमिक शाळांचा आश्रय घेतला आहे, तर ३४९ अंगणवाड्यांना गावातील समाजमंदिर व इतर सार्वजनिक ठिकाणांचा आधार देण्यात आला आहे. अंगणवाड्यांच्या इमारतींसाठी जमीन मिळावी, यासाठी दानशुरांना जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून वेळोवेळी आवाहनही करण्यात आले होते. मात्र, त्याला अगदी किरकोळ प्रमाणात प्रतिसाद लाभला. जिल्ह्यातील केवळ २० अंगणवाड्यांना दानशुरांनी आपली जमीन पाच पैसेही न घेता दान केली. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात २० अंगणवाड्यांना नवीन इमारतींचे बांधकाम करण्यात येणार आहे. या इमारतींच्या बांधकामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ४ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. हे अनुदान वेळेत खर्च होणे आवश्यक आहे.मंडणगड ५८दापोली ७१खेड ३५चिपळूण १९गुहागर ३३संगमेश्वर ४४रत्नागिरी १४राजापूर ३६एकूण३४९आपल्या भागातील अंगणवाडीला स्वत:ची इमारत असावी, असा प्रयत्न जिल्हा परिषद सदस्यांकडूनही होताना दिसत नाही.
जिल्ह्यात १५९२ अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारतीच नाहीत
By admin | Published: August 28, 2015 11:27 PM