शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
7
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
8
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
9
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
10
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
11
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
12
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
15
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
16
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
17
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
18
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
19
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
20
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?

रिफायनरीमुळे दीड लाख नोकऱ्या उपलब्ध : अनिल नागवेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 5:05 PM

राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पामुळे दीड लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असून या प्रकल्पामुळे पर्यावरणाला बाधा पोहोचत नाही, अशी माहिती रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाचे जनसंपर्क अधिकारी अनिल नागवेकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देरिफायनरीमुळे दीड लाख नोकऱ्या उपलब्ध : अनिल नागवेकर मुंबईपेक्षाही राजापूरला महत्त्व येणारनाणार प्रकल्पामुळे मोठी आर्थिक उलाढालही होणार

सिंधुदुर्ग : राजापूर तालुक्यातील नाणार येथील रिफायनरी प्रकल्पामुळे दीड लाख नोकऱ्या उपलब्ध होणार असून या प्रकल्पामुळे पर्यावरणाला बाधा पोहोचत नाही. भारतात २३ ठिकाणी रिफायनरी प्रकल्प असून कोकणात हा प्रकल्प पहिलाच आहे. या प्रकल्पामुळे राजापूर शहरात मोठी आर्थिक उलाढाल होणार असून त्याचा फायदा स्थानिकांनाच होणार आहे, अशी माहिती रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाचे जनसंपर्क अधिकारी अनिल नागवेकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.अनिल नागवेकर पुढे म्हणाले, मुंबईतील चेंबूर येथे २ रिफायनरी प्रकल्प आहेत. त्या ठिकाणी कोणतेही प्रदूषण होत नाही. नाणार येथील प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. आता ज्या बागायतदारांकडे मजूर म्हणून काम करीत आहेत त्या मजुरांना किती बागायतदार पीएफ देतात व कोणती सुविधा देतात याचा विरोध करणाऱ्यांनी विचार करावा. प्रकल्पाला विरोध करण्यापेक्षा प्रकल्प काय आहे ते आधी समजून घ्यावे.शिवसेनेचे पूर्वी या प्रकल्पाला समर्थन होते. आता ते विरोध करीत आहेत. या प्रकल्पामुळे राजापुरात आर्थिक गंगा येणार आहे याचा कोणीही विचारच करीत नसल्याबद्दल अनिल नागवेकर यांची चिंता व्यक्त केली. प्रकल्पाला विरोध करण्यापेक्षा या प्रकल्पामुळे होणाऱ्या फायद्याचा विचार करायला हवा. कोकणातील अनेक पिढ्या यामुळे सुखी होणार आहेत. आता कोकणात ६० ते ७० टक्के लोकांची घरे बंद आहेत. सर्व तरुण मुंबईला नोकरीसाठी जात आहेत.जमीन मालकांना आपल्या मुलांच्या नोकरीबाबत प्रकल्प व्यवस्थापन हमी द्यायला तयार आहे. शिक्षणाप्रमाणे नोकरी मिळेल. ज्याचे जसे शिक्षण आहे त्या प्रमाणे आयटीआयटी कोर्स देऊन सुशिक्षित बेरोजगारांना घडवण्यात येणार आहे. मात्र, स्थानिकांनी या बाबत प्रकल्प व्यवस्थापनाशी चर्चा करणे आवश्यक असल्याचे अनिल नागवेकर यांनी सांगितले.प्रकल्पाबाबत अपप्रचार!केरळ, गुजरात, चेन्नई, कलकत्ता आदी ठिकाणी रिफायनरी प्रकल्प आहेत. या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. काहीजण हा प्रकल्प कोळशावर चालणारा आहे, असे सांगून प्रकल्पाच्या विरोधात चुकीची माहिती ग्रामस्थांमध्ये पसरवित आहेत. मात्र, प्रकल्पग्रस्तांनी हा प्रकल्प काय आहे हे समजून घेऊन आपल्या मुलांना कशा प्रकारे नोकऱ्या मिळणार आहेत याची कंपनीकडून माहिती करून घेणे आवश्यक आहे.

जर आपल्या मुलांना चांगली नोकरी मिळणार असेल तर जमीन मालकांनी या प्रकल्पाचे समर्थन करणे आवश्यक आहे. या प्रकल्पात कायमस्वरूपी नोकरी असून पीएफ, ग्रॅच्युईटी आदी सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. याचा लाभ जमीन मालकांनी घेऊन आपल्या कुटुंबाच्या भवितव्याचा विचार करावा. या प्रकल्पामुळे आपल्या घरात आर्थिक सुबत्ता येणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पsindhudurgसिंधुदुर्ग