रत्नागिरी : स्मार्ट फोन, इंटरनेट सुविधेमुळे अनेक व्यवहार आता घरबसल्या होत आहेत. ग्राहकांना घरबसल्या वीजबिल भरता यावे, यासाठी महावितरण कंपनीनेही आॅनलाईन सुविधा सुरू केली आहे. वर्षभरात जिल्ह्यातील १ लाख ४४ हजार ९८९ ग्राहकांनी १७ कोटी २२ लाख २५ हजार ८४० रूपयांचा महसूल महावितरणकडे जमा केला आहे.वीज बिल भरणा केंद्र वा बँकेतील काऊंटरवर वीजबिल भरण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागते. त्यापेक्षा इंटरनेट सुविधेमुळे घरबसल्या ग्राहकांना वीजबिल आॅनलाईन भरणे सोपे झाले आहे. त्यामुळे वेळेची बचत होत आहे. दिवसेंदिवस आॅनलाईन सेवेकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. जिल्ह्यातील मंडणगड तालुक्याचा फारसा विकास झालेला नाही. मात्र, तरीही आॅनलाईन सुविधेचा वापर या तालुक्यातून अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच गुहागर तालुक्यातूनही हजाराच्या पटीत ग्राहक या सुविधेचा लाभ घेत आहेत. चिपळूण विभागातील ४१ हजार ७९६ ग्राहकांनी वर्षभरात ३ कोटी ९९ लाख १७ हजार ८६० रूपये वीजबिलाचे भरले आहेत. खेड विभागातील २७ हजार १८२ ग्राहकांनी ४ कोटी १३ लाख १८ हजार १०० रूपये भरले आहेत.तसेच रत्नागिरी विभागातून ७८ हजार ७०९ ग्राहकांनी ९ कोटी ४४ लाख ५६ हजार ९० रूपयांचा महसूल जमा केला आहे. जिल्ह्यातील खेड व चिपळूण विभागातील एकूण ग्राहकांपेक्षा रत्नागिरी विभागातील ग्राहकांची संख्या अधिक असून, महसूलही अधिक आहे.आॅनलाईन सुविधेचा दिवसेंदिवस वापर वाढू लागला आहे. दरमहा कोटीचा महसूल आॅनलाईन वापरामुळे मिळू लागला आहे. भविष्यात महावितरणला आता बँका किंवा पोस्ट कार्यालयांवर विसंबून राहावे लागणार नाही. शहरी भागात आॅनलाइृन सेवेला जास्त प्रतिसाद मिळत असला तरी ग्रामीण भागात हा प्रतिसाद वाढल्यानंतर या महसुलात आणखीन वाढ होणार आहे. (प्रतिनिधी)रत्नागिरीचा संपूर्ण वर्षभरातील महसूल पुढीलप्रमाणेमहिनाग्राहकमहसूलएप्रिल१०३०३९९४२९९०मे१०२४७१२५५२३७०जून९८७९१३३०३८४०जुलै११५३६१३९०१६९०आॅगस्ट११६२९१३७९३१४०सप्टेंबर११३८८१२१३५१००आॅक्टोबर१२४६८१३३०३१८०नोव्हेंबर१२५४१ १४३५३८००डिसेंबर१३२०४१७०७५०९०जानेवारी१३३४४१७८९६०६०फेब्रुवारी१३१५९१४९९९०२०मार्च१५२९११८९६९५६०रत्नागिरी विभागातून ७८ हजार ७०९ ग्राहकांकडून ९ कोटी ४४ लाख ५६ हजार ९० रूपयांचा महसूल जमा.रत्नागिरी जिल्ह्यातील १ लाख ४४ हजार ९८९ ग्राहकांनी घेतला लाभ.
आॅनलाईनमुळे १७ कोटी
By admin | Published: April 15, 2015 11:32 PM