सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १७.२५ मी. मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात १९२३.२५ मि. मि. सरासरी पाऊस झाला आहे.गेल्या चोवीस तासातील तालुकानिहाय पाऊसदोडामार्ग-२२, सावंतवाडी -१७, वेंगुर्ला- १४, कुडाळ -१२, मालवण -४, कणकवली -३६, देवगड- १५, वैभववाडी -१८.तिल्लारी आंतरराज्य पाणलोट क्षेत्रात २४.४0 मि.मि. पाऊसतिल्लारी आंतरराज्य प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात २४.४0 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. या पाणलोट क्षेत्रात आजपर्यंत २७१६.८0 मि.मि. एकूण पाऊस झाला असून धरणात ३६७.४0१0 द.ल.घ.मी. पाणी साठा झाला आहे. कोर्ले- सातंडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात १७ मि.मी. एकूण पाऊस १७९९ मि.मि. देवघर प्रकल्प १५ मि.मि. एकूण पाऊस २१२३.६0 मि.मि. झाला आहे. या धरणात अनुक्रमे २५.५६४0 द.ल.घ.मी व ७२.६७00 द.ल. घ. मी पाणीसाठा झाला आहे.