शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
4
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
5
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
6
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
7
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
8
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
9
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
10
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
11
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
12
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
13
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
14
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
15
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
16
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
17
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
18
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
19
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
20
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"

सिंधुदुर्गात १८ धरणे १०० टक्के भरली, गेल्या चोवीस तासांत ४७.२ मिलीमीटर पावसाची नोंद

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 17, 2024 6:16 PM

गिरीश परब सिंधुदुर्ग : दोन दिवसांच्या छोट्याशा विश्रांतीनंतर बुधवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सुदैवाने कोठेही पूरस्थिती निर्माण झाली ...

गिरीश परबसिंधुदुर्ग : दोन दिवसांच्या छोट्याशा विश्रांतीनंतर बुधवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सुदैवाने कोठेही पूरस्थिती निर्माण झाली नव्हती; परंतु आंबोली येथे घाटात मोठा दगड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. आतापर्यंत १८ धरणे १०० टक्के भरली आहेत, तर तिलारी, कोर्ले सातंडी, देवधर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून, या तिन्ही प्रकल्पांतून १४,२७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या २४ तासांत ४७.२ च्या सरासरीने पाऊस झाला आहे.१५ ते १७ जुलै कालावधीत ऑरेंज अलर्ट दिला होता. पहिले २ दिवस जिल्ह्यात पावसाने थोडी उसंत घेतली होती. १७ जुलै रोजी सकाळपासून पाऊस सुरू झाला आहे. बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस चालू आहे. सुदैवाने पूरस्थिती निर्माण झाली नव्हती. आंबोली येथे सकाळी मोठा दगड कोसळून रस्त्याच्या मधोमध असल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. छोटी वाहन बाजूने जात होती. घटनास्थळी पोलिस हवालदार दत्ता देसाई, दादा शिंदे, पोलिस हवालदार प्रवीण सापळे, महेंद्र बांधेकर यांनी पोहोचून मदतकार्य करत जेसीबीच्या साहाय्याने दगड बाजूला करण्यात आला. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.आज झालेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तिलारी, तेरेखोल, कर्ल्ली, गड, वाघोटन या प्रमुख नद्या आहेत. या नद्यांनी इशारापातळी जरी ओलांडली तरी ग्रामीण भागात पुरसादृश स्थिती निर्माण होते. आज सुरू असलेल्या पावसामुळे सर्व नद्या इशारा पातळीच्या खालून वाहत आहेत. त्यामुळे कोणताही प्रकारचा धोका उद्भवण्याची शक्यता फार कमी आहे. चालू पावसाळी हंगामात घरांची पडझड, गोठे, नांगर, दुकाने यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. शेती पाण्याखाली जाऊन तिचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नुकसानीचा आकडा हा पाच कोटींच्या बाहेर गेला आहे. मात्र, जे लोक बाधित झाले आहेत, त्यांना जिल्हा प्रशासनाकडून मदत देण्यात आलेली आहे. मात्र नुकसानग्रस्त भरीव मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत झालेला पाऊसदेवगड - ६०.४ मिमी, मालवण ३८.८ मिमी, सावंतवाडी ५५.३, मिमी, वेंगुर्ला ३८.८ मिमी, कणकवली ४७.७ मिमी, कुडाळ ४२.२ मिमी, वैभववाडी ४८ मिमी, दोडामार्ग ५४ मिमी पाऊस पडल्याची नोंद प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे.

धरणे भरली; पाण्याचा विसर्ग सुरूतिलारी, कोर्ले सातंडी, देवधर हे मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून, त्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. अनुक्रमे ४ हजार १०७, ९ हजार ४४३, ७२८, असा मिळून १४,२७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर १८ धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून यामध्ये शिवडाव, तरंदळे, आडेली, आंबोली, हातेरी, मांडखोल, सनमतेंबं, हरकुल, ओझरम, निळेली, पुळास, वाफोली, लोरे, शिरवल, धामापूर, वर्दे, ओसरगाव यांचा समावेश आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसDamधरण