शहरं
Join us  
Trending Stories
1
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
2
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
3
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
4
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
5
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
6
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
7
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
8
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
9
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
10
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
11
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
12
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
13
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
14
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
15
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
16
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
17
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
18
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
19
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
20
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना

'कुणबी आरक्षणाचा फायदा सिंधुदुर्गातील 20 हजार मराठा बांधवांना होणार' 

By अनंत खं.जाधव | Published: January 29, 2024 7:24 PM

अॅड.सुहास सावंत यांचा दावा : प्रशासनावर मात्र नाराज 

सावंतवाडी : कुणबी आरक्षणाचा फायदा सिंधुदुर्गातील २० हजारहून अधिक मराठा बांधवांना होणार आहे, असा दावा अखिल भारतीय मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत यांनी केला आहे. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनावर यावेळी मात्र त्यांनी नाराजी व्यक्त केली प्रशासनाने कुणबी दाखले शोधण्यात तत्परता दाखवली नसल्याचा आरोप केला आहे. यावेळी विकास सावंत, पुंडलिक दळवी, अभिषेक सावंत उपस्थित होते.सावंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडुन आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर होणार्‍या सर्व्हेत ढिलाई होत आहे, मात्र आम्ही सर्वजण जिल्ह्यातील समाज बांधवांना आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी योग्य पध्दतीने सर्व्हेक्षण केले जावे, प्रयत्न करणार आहोत.मराठे युध्दात जिंकले, मात्र तहात हरले, अशी टिका काही लोकांकडून करण्यात येत आहे यावर सावंत यांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, या ठिकाणी आम्ही तहात हरलो, असे कोण म्हणत असेल तर ते चुकीचे आहे. जरांगे पाटील यांच्या आरक्षणाचा फायदा सिंधुदुर्ग,रत्नागिरी जिल्ह्याला सुध्दा झाला आहे. सद्यस्थितीत करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात १४०० नोंदी सापडल्या आहेत. त्याचा फायदा २० हजारहून अधिक बांधवाना होणार आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सगे सोयरे या शब्दाचा आधार घेवून ज्यांना दाखले मिळण्यास अडचणी येणार त्यांना दाखले मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत.ते पुढे म्हणाले, या ठिकाणी आम्ही महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी अभिषेक सावंत यांना नियुक्ती दिली आहे. यावेळी उपस्थितांच्या हस्ते सावंत यांना नियुक्तीपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष आशिष काष्टे, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष मनोहर येरम, संजय लाड, अब्जू सावंत, विशाल सावंत, प्रशांत ठाकूर, नंदादीप विचारे, शिवदत्त घोगळे, सतीश सावंत, सुनील सावंत, अभिजीत सावंत, प्रसाद राऊळ, सूर्यकांत राऊळ, मुकेश जाधव, संदीप गवस आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMaratha Reservationमराठा आरक्षण