शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
4
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
5
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
6
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
7
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
8
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
9
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

२३२ ग्रामपंचायतींना ‘थेट सरपंच’चा मान

By admin | Published: July 05, 2017 12:19 AM

२३२ ग्रामपंचायतींना ‘थेट सरपंच’चा मान

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत थेट जनतेतून सरपंच निवड करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयावर पावसाळी अधिवेशनात शिक्कामोर्तब होणार असून, त्यानंतर त्याची अंमलबजावणी होणार आहे. आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २३२ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यामुळे या ग्रामपंचायतींमध्ये सरपंच थेट जनतेतून निवडले जाण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात २३१ ग्रामपंचायतींची मुदत आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत संपत आहे. त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार या ग्रामपंचायतींची प्रभाग रचनाही तयार झाली आहे. ३१ जुलै रोजी प्रभाग रचना अंतिम करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची अंतिम मान्यता मिळणार आहे, तर ३ आॅगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचनेला प्रसिद्धी दिली जाणार आहे. आॅक्टोबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २३२ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड थेट लोकांमधून होण्याची शक्यता आहे. नव्या कायद्यानुसार सरपंच पदाच्या अधिकारांमध्येही वाढ होणार असून, गावचा अर्थसंकल्प बनवण्याचा अधिकारही सरंपचाकडे राहणार आहे. जिल्ह्यातील २३२ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना आणि आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर झाल्याने निवडणुकांचे पडघम सध्या वाजू लागले असून याठिकाणी थेट सरपंच निवड घेतली जाणार आहे.जिल्हा : थेट सरपंच निवड होणाऱ्या ग्रामपंचायतीमंडणगड (१७) अडखळ, पिंपळोली, दहागाव, तिडे - तळघर, मुरादपूर, कुंबळे, दुधेरे, बामणघर, वेसवी, लोकरवण, देव्हाळे, शिगवण, बाणकोट, विन्हे, सडे, तोंडली, उन्हवरे, वाल्मिकीनगर.दापोली (३३) बोंडिवली, देहेणे, उंबरशेत, कडावळे, सातेरेतर्फ नातू, टाळसुरे, आगरवायंगणी, मुर्डी, जालगाव, वेळवी, दमामे, करंजाणी, विरसई, शिर्दे, सारंग, पाचवली, वांझकोळी, हातीप, शिरसाडी, सोवेली, देगाव, उंबर्ले, कादिवली, कोळबांद्रे, आपटी, कळंबट, करंजगाव, सडवे, भडवळे, उसगाव, डौली, मांदिवली, कवडोली.खेड (१०) कळंबणी बुद्रुक, चिंचवली, संगलट, भोस्ते, अलसुरे, निळीक,तिसंगी, कोंडवली, घाणेखुंट, भेलसई. गुहागर (२१) आरे, अवारे असोरे, आबलोली, कोतळूक, कौंढरकाळसुरे, खोडदे, चिखली, जानवळे, जांभारी, झोंबडी, धोपावे, पाली, पाटपन्हाळे, पालकोट त्रिशूळ, पांगारीतर्फे हवेली, पोमेंडी, मढाळ, वरवेली, वडद, साखरीत्रिशूळ, हेदवी.चिपळूण (३४) मालदोली, नादरखेरकी, ओमळी, परशुराम, पेढे, शिरगाव, शिरवली, उमरोली, वहाळ, आंबतखोल, आंबिटगाव, असुर्डे, बामणोली, भिले, बिवली, ढाकमोळी, देवखेरकी, डुगवे, धामेलीकोंड, गुढे, गुळवणे, गाने, गोंधळे, कळकवणे, खांदाटपाली, कामथे, कामथे खुर्द, कापरे, करंबवणे, केतकी, खांडोत्री, नवीन कोळकेवाडी, कालुस्ते बुद्रुक, कालुस्ते खुर्द.संगमेश्वर (३७) तांबेडी, शेंबवणे, तुरळ, फणसवणे, गुरववाडी, शृंगारपूर, निवळी, माभळे, ओझरखोल, वांद्री, फुणगूस, पोचरी, कोंडगाव, साखरपा, मेघी, माखजन, मावळंगे, आंबव, सरंद, कासे, पेढांबे, कळंबुशी, शिरंबे, कुंडी, पाटगाव, आंबवली, सांगवे, फणसट, किरडुवे, वाशीतर्फ संगमेश्वर, कुळे, बोरसूत, मुचरी, शिवणे, राजिवली, तुळसणी, ओझरे बुद्रुक.रत्नागिरी (२९) वेळवंड, मावळंगे, टिके, वेतोशी, वळके, तरवळ, बोंड्ये, टेंभ्ये, निवळी, सत्कोंडी, भगवतीनगर, गावडेआंबेरे, साठरे, मालगुंड, जांभारी, करबुडे, चाफेरी, गणेशगुळे, धामणसे, पूर्णगड, कासारवेली, केळ्ये, चांदोर, निवेंडी, निरूळ, फणसवळे, सड्ये पिरंदवणे, विल्ये, तोणदे.लांजा (१९) बेनी बुद्रुक सालपे, रूण, कुर्णे, भडे, खानवली, खावडी, तळवडे, कोंडगे, कोट, आरगाव, वाकेड, वाघ्रट, आगवे, करचुंब, वेरळ, वेरवली खुर्द, निवसर, पूनस. राजापूर (३२) तळवडे, डोंगर, कळसवली, साखरीनाटे, झर्ये, उपळे, शेजवली, कोतापूर, देवीहसोळ, जैतापूर, हातीवले, ओझर, कोळवणखडी, जुवाठी, येळवण, खरवते, मिठगवाणे, नाणार, परूळे, शिवणे बुद्रुक, नाटे, हसोळतर्फ सौंदळ, धाऊलवल्ली, साखर, वडवली, वाटूळ, प्रिंदावण, पाचल, माडबन, विल्ये, जुवे जैतापूर.