गिरीश परब -q सिंधुदुर्गनगरीराज्यात शाळाबाह्य मुले असल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ४ जुलै रोजी एकाच दिवशी करण्यात येणाऱ्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी २७१५ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील तब्बल २ लाख ९ हजार ८३९ कुटुंबांच्या सर्वेक्षणामधून शाळाबाह्य मुलांची माहिती घेण्यात येणार आहे.६ ते १४ वयोगटातील एकही बालक शिक्षणामुळे वंचित राहू नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तरीसुद्धा राज्यात शाळाबाह्य मुले असल्याची शक्यता गृहीत धरून राज्यात एकाच दिवशी म्हणजे ४ जुलै रोजी शाळाबाह्य मुलांचा सर्व्हे करण्याचे आदेश सरकारने दिले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण विभागाकडून अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुकाग्रामीणशहरीसर्वेक्षण झोनल नियंत्रणकुटुंबसंख्याकुटुंबसंख्याअधिकारीअधिकारीअधिकारीदोडामार्ग१२०६५-१५५१०१देवगड२७८००-३३६२०१कणकवली२७८६४६०६६४१३२२१कुडाळ३४१२७४००१४५७२५१मालवण२४३०४४६२०३४६६२०१सावंतवाडी२७१५४८८०४४२५२२१वैभववाडी११५४५-१४७१०१वेंगुर्ला१८३७२३१४७२६४१५१+ २५० राखीवएकूण१८३२०१२६६३८२५६३१४४८...असे होणार सर्वेक्षणजिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी नेमणूक केलेले सर्वेक्षण अधिकारी, झोनल अधिकारी व नियंत्रण अधिकारी ४ जुलैपासून सकाळी सर्वेक्षणास सुरुवात करणार आहेत. निवडणूक मतदान प्रक्रियेप्रमाणे ६ ते १४ वयोगटातील बालकांच्या बोटाला शाई लावून सर्वेक्षण पूर्ण केले जाणार आहे व त्याचा अहवाल तत्काळ शासनास सादर करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात २७१५ अधिकारी नियुक्त
By admin | Published: June 19, 2015 11:49 PM