वेंगुर्ले : वेंगुर्ले वायंगणी समुद्रकिनारी आॅलिव्ह रिडले जातीची ३१७ कासवांची पिल्ले वनअधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली. वायंगणी समुद्रकिनारी आॅलिव्ह रिडले जातीच्या दुर्मीळ कासवांची अंडी कासवमित्र सुहास तोरसकर यांनी वनखात्याच्या सहकार्याने व केळकर विद्यालय देवगडचे प्राचार्य नागेश दप्तरदार यांच्या मार्गदर्शनाने दोन ठिकाणी संरक्षित केली होती. यातील ३१७ आॅलिव्ह रिडले कासवांची पिल्ले गुरुवारी मठ वनपाल व्ही. एम. मसुरकर, वनरक्षक सुरेश मेथर व कासवमित्र सुहास तोरसकर यांनी नैसर्गिक अधिवासात समुद्रात सोडली. यावेळी घन:शाम तोरसकर, भालचंद्र तोरसकर, अशोक कोचरेकर, दीपक तोरसकर, प्रसाद पेडणेकर, अशोक तारी, ऋषिकेश बिर्जे, शशी पेडणेकर, सूरज तोरसकर, प्रकाश खोबरेकर, विनायक कोंडूरकर तसेच वायंगणी शाळा नं. २ चे विद्यार्थी, शिक्षक, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
कासवाची ३१७ पिल्ली नैसर्गिक अधिवासात
By admin | Published: April 17, 2015 9:20 PM