शहरं
Join us  
Trending Stories
1
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
2
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
3
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
4
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
5
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
6
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
7
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
8
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
9
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
11
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
12
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
13
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
14
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
15
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
16
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
17
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
18
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
19
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
20
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'

सावंतवाडीत वर्षभरात ३५ चोऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2015 12:52 AM

एकालाही अटक नाही : पोलिसांची अकार्यक्षमता उघड, नागरिकांचा विश्वास उडाला

प्रसन्न राणे / सावंतवाडी शहरात चोरांच्या उच्छाद वाढला असून येथील नागरिकांमध्ये सध्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे एका वर्षात शहरात सुमारे ३५ चोऱ्या झाल्याअसून आतापर्यंत पोलीसांना एकाही आरोपीस अटक करण्यात यश आले नाही. पोलीसांची ही कुचकामी यंत्रणा पाहून येथील चोरही आता निर्ढावलेले आहे. एकाच दिवशी एक नव्हे, तर सलग पाच-सहा फ्लॅट फोडून लाखांचा मुद्देमाल लंपास करत आहेत. यामुळे नागरिकांचाही पोलीसांवरील विश्वास उडाला असून चोरी झाली असली तरी काहीजण तक्रार नोंदीवण्यास पुढे येत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गेल्या दोन रात्री घडलेल्या चोरांचा उच्छादांनी शहरवासी भयभीत झाले आहेत. शनिवारी (दि. १३) मध्यरात्री व रविवारी (दि.१४) मध्यरात्री चोरांनी एकुण ९ ठिकाणचे बंद फ्लॅट व दुकाने फोडून एकुण १० लाखांचा माल लंपास केला. पोलीसांनी या घटनेकडे गांभीऱ्यांने पाहणे आवश्यक आहे. पेट्रोलिंग नावापुरतेच शहरातील गस्तीच्यावेळी मोठी पोलीस व्हॅनचा वापर केला जातो. ही व्हॅन गल्ली-बोळातून कधीच फिरत नाही. काही मुख्य ठिकाणीच उभी असते. पोलीस व्हॅनमधून उतरून भरकटणाऱ्या नागरिकांची साधी चौकशीदेखील करताना दिसत नाही. हे चित्र बदलायला हवे. गस्तीला सहाच पोलीस शहराचा विस्तार व लोकसंख्या पाहता रात्रीच्या गस्तीला असणारे सहा पोलीस ही संख्या खूपच कमी आहे. हे पोलीस शहरातील मुख्य ठिकाणीच गस्त घालत असतात व गल्ली-बोळातील नागरिकांची सुरक्षा टांगणीवर असते. मंगळवारी चोरीच्या घटना अधिक मंगळवार हा शहराचा आठवडयाचा बाजाराचा दिवस आहे. या दिवशी महिलांच्या गळ्यातील सोने पळविण्याचे व पाकिट मारण्याच्या घटना अधिक घडतात. याकडे पोलीस यंत्रणेचे कायमच दुर्लक्ष राहिले आहे. पोलीस बंदोबस्तास एकच पोलीस असल्याकारणाने चोरीचे प्रकार होताना दिसते. चोरीच्या घटनास्थळी काही ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज चोरट्यांचे सापडूनही अद्यापही एकाही चोराला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. आंबोली येथे कॉन्स्टेबल संजय खाडे यांच्या चानाक्षपणामुळे २९ नोव्हेंबर २०१४ रोजी चोरट्यांची टोळी पकडण्यात पोलीसांना यश आले होते. दोघे संशयित सायकलवरून एक पिशवी घेऊन जात होते. त्यावेळी कॉन्स्टेबल खाडे यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्या पिशवीत देवळातील घंटा सापडल्या. पोलीसी दणका दिल्यानंतर त्यांनी आणखी काही चोरांचे नावे सांगितले. पोलीस संख्या अपुरी सावंतवाडी तालुक्याची २५००० लोकसंख्या असून यांच्या सुरक्षेसाठी एक पोलीस निरीक्षक, चार पोलीस उपनिरीक्षक, तीन पोलीस हेडकॉन्स्टेबल व ८२ पोलीस कर्मचारी कार्यरत आहे. याच ठाण्याकडे माजगाव, कोलगाव, आरोंदा, सातार्डा, तळवडे, मळगाव, आंबोली, कलंबिस्त गावांचीही सुरक्षा आहे. या बंदोबस्तासह सावंतवाडीच्या १५००० लोकसंख्येच्या सुरक्षेसाठी पोलीस संख्या अपूरी आहे. ४आतापर्यंत झालेल्या चोरीप्रकरणी कधीही ठसेतज्ज्ञ व श्वानपथकास यश मिळालेले नाहीच. श्वान हे नेहमीच चोरीच्या घटनास्थळापासून काही अंतरावर घुटमळतच राहिले आहेत.