आॅनलाईन लोकमतसिंधुदुर्गनगरी दि. १0: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी ३५.१५मी. मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात ११६३.८२ मि. मि. सरासरी पाऊस झाला आहे.
गेल्या चोवीस तासातील तालुकानिहाय पाऊस
दोडामार्ग- २४ , सावंतवाडी २६, वेंगुर्ला- २७.२, कुडाळ -६0, मालवण -११ , कणकवली -३0, देवगड- ३५, वैभववाडी ६८.
तिलारी पाणलोट क्षेत्रात १५ मि.मि. पाऊस
तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात १५.00 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. या पाणलोट क्षेत्रात आजपर्यंत १४८३.६0 मि.मि. एकूण पाऊस झाला असून धरणात २८३.२६९0 द.ल.घ.मी. पाणी साठा झाला आहे. देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात ७.५ मि.मी. एकूण पाऊस १0६५.२0 मि.मि. कोर्ले सातंडी ५३ मि.मि. एकूण पाऊस ९२८ मि.मि. झाला आहे. या धरणात अनुक्रमे ५४.१४९0 द.ल.घ.मी व २५.५६४0 द.ल. घ. मी पाणीसाठा झाला आहे.