सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदासाठीची निवडणूक १२ सप्टेंबर रोजी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी एकूण ४३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने १७ जागांसाठी ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिले आहेत. या उमेदवारांचे भवितव्य ६१३४ मतदार सभासदांच्या हाती असणार असून निवडणुकीचे अंतिम चित्र १३ सप्टेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. दरम्यान, ही लढत काँग्रेस-राष्ट्रवादी विरूद्ध शिवसेना-भाजप यामध्ये दुरंगी लढत होणार आहे. आघाडीच्या दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदांच्या १९ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र राजकीय पक्षाचा निर्णय बदलल्याने ही लढत आता दुरंगी होणार आहे. सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसची सत्ता असून सर्व संचालक हे काँग्रेसचेच आहेत.या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५ मतदारसंघ असून त्यासाठी १९ संचालकपदे आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघाच्या ४ जागांसाठी ३१०२ मतदार मतदान करणार आहेत. सहकारी संस्था मतदारसंघाच्या ११ जागांसाठी २६०१ मतदार मतदान करणार आहेत. हमाल मतदारसंघासाठी एका जागेसाठी २७ मतदार, व्यापारी मतदारसंघाच्या २ जागांसाठी १२२ मतदार तर पणन प्रक्रियेच्या एका जागेसाठी २८२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. (प्रतिनिधी)दुरंगी लढतीने चुरस१७ जागांसाठी ९२ उमेदवारांनी अर्ज भरले होते. यातील ११ उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले. ४३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेतले. तर ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिले आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे आघाडी विरुद्ध युती असा फॉर्म्युला वापरण्यात आला होता. तोच फॉर्म्युला जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीतही कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी विरूद्ध शिवसेना-भाजप युती अशी दुरंगी लढत तर एक अपक्ष उमेदवार या निवडणुकीत नशीब आजमावणार आहेत. या १९ जागांपैकी ग्रामपंचायत मतदारसंघातील अनुसूचित जाती जमातीमधील उमेदवार बिनविरोध झाल्याने आता १७ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.काँग्रेस उमेदवारग्रामपंचायत मतदारसंघ : संतोष राणे, तुकाराम साईल. सहकारी संस्था सर्वसाधारण : राजन परब, प्रकाश राणे, अरविंद रावराणे, तुलसी रावराणे, जाकी डिसोजा. सहकारी संस्था महिला : सुजाता देसाई, कल्पना बुडकुले. सहकारी संस्था भटक्या जमाती : गंगाराम वरक. व्यापारी मतदारसंघ : विजय हळदिवे, संजय लुडबे. हमाल मतदारसंघ : मनिष दळवी. तर ग्रामपंचायत मतदारसंघातून संतोष कासकर व भरत जाधव बिनविरोध निवडून आले.शिवसेना भाजपा युती उमेदवारसर्वसाधारण विकास संस्था : प्रकाश पार्सेकर (मळेवाड - शिवसेना), सुधीर गवस (झोळंबे - शिवसेना), रमाकांत सावंत (नरडवे - शिवसेना), दिगंबर तावडे (शिरगांव- शिवसेना), राजन यादव (श्रावण - शिवसेना), प्रमोद राऊळ (तेंडोली - भाजपा), दीपक कदम (खुडी-भाजपा). इतर मागास विकास संस्था : राजेंद्र सुतार (एडगांव-भाजपा). विमुक्त जाती, जमाती सहकारी संस्था : शामसुंदर गवळी (आचरा-शिवसेना). महिला विकास संस्था : स्नेहा दळवी (वेताळ बांबर्डे -शिवसेना), अनिषा परब (तळवडे-शिवसेना). प्रक्रिया पणन संस्था : अनंत फोंडके (हेत -भाजपा). व्यापारी मतदारसंघ : मिलिंद खाडये (कलमठ - भाजपा), ऋषीकेश मसुरकर (फोंडाघाट-शिवसेना). ग्रामपंचायत सर्वसाधारण : रघुनाथ रेडकर (तळवडे-शिवसेना), गजानन प्रभू (तारामुंबरी-शिवसेना). राष्ट्रवादीचे उमेदवारसहकारी संस्था सर्वसाधारण : अवधूत रेगे, कृष्णा करलकर. इतर मागास सहकारी संस्था : स्नेहल पाताडे.अपक्ष उमेदवारसहकारी संस्था सर्वसाधारण : रविंद्र कसालकर, संजय वायंगणकर. इतर मागास सहकारी संस्था : धनंजय टेंबकर. हमाल मतदार संघ : समीर परब. यांचा समावेश आहे.
सतरा जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात
By admin | Published: August 28, 2015 11:51 PM