रत्नागिरी : आॅनलाईन, एटीपी केंद्र किंवा अन्य वीजबिल भरणा केंद्रांवर दरमहा प्राधान्याने वीजबिल भरणारे प्रामाणिक ग्राहक असताना दुसरीकडे वीजबिले थकविणारे ग्राहकही आहेत. त्याचा भुर्दंड महावितरणला बसत आहे. जिल्ह्यातील ४५ हजार ५४६ ग्राहकांनी ४ कोटी ८४ लाख ६६ हजार रूपये थकविले आहेत.महावितरण कंपनीकडून ग्राहकांना वीजबिल भरणे सुकर व्हावे, यासाठी बँका, पतसंस्था, महा-ई-सेवा केंद्रांबरोबरच आॅनलाईन तसेच एटीपी केंद्रांमधून वीजबिले स्वीकारण्यात येतात. तरीही जानेवारीअखेर जिल्ह्यातील ४५ हजार ५४६ ग्राहकांनी ४ कोटी ८४ लाख ६६ हजार रूपये थकविले आहेत. चिपळूण विभागातील ९ हजार ६०२ घरगुती ग्राहकांनी ६८ लाख ८० हजार, वाणिज्य विभागाच्या १२८३ ग्राहकांनी २९ लाख ४५ हजार, तर औद्योगिकच्या ३१७ ग्राहकांकडून १६ लाख ३ हजार, कृषिपंपाच्या ३४२ ग्राहकांनी २ लाख १२ हजार, सार्वजनिक पाणी पुरवठा विभागाच्या १८८ कार्यालयांकडून १७ लाख ४३ हजार, स्वराज्य संस्थांकडून ५३ हजार, अन्य १४५ ग्राहकांकडून २ लाख ५० हजार मिळून ११ हजार ८८४ ग्राहकांकडून १ कोटी ३६ लाख ८५ हजार रूपये थकविण्यात आले आहेत. खेड विभागातील १२ हजार १२९ घरगुती ग्राहकांकडून ९२ लाख ६७ हजारांची थकबाकी शिल्लक आहे. वाणिज्य विभागाच्या १३०५ ग्राहकांकडून २३ लाख ४२ हजार, औद्योगिक विभागातील २९८ ग्राहकांकडून २८ लाख ३० हजार, कृषिपंपाच्या ६१० ग्राहकांकडून ४ लाख ६९ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठा विभागातील २१६ कार्यालयांकडून १४ लाख ५४ हजार, पथदिव्यांचे २५२, स्थानिक स्वराज्य संस्थांकडून १६ लाख ८८ हजार, अन्य २३२ ग्राहकांकडून ५ लाख ३२ हजार मिळून एकूण १५ हजार ४२ ग्राहकांनी १ कोटी ८५ लाख ८२ हजार रूपये थकविले आहेत. विभागातील १४ हजार ९२७ ग्राहकांनी ९८ लाख ७३ हजार रूपये थकविले आहेत. वाणिज्य विभागातील २ हजार ५७ ग्राहकांकडून ३६ लाख १० हजार, औद्योगिकच्या ३६४ ग्राहकांनी ८ लाख ९८ हजार, कृषिपंपाच्या ७१४ ग्राहकांनी ४ लाख १६ हजार, सार्वजनिक पाणीपुरवठाच्या २६१ कार्यालयांकडून ८ लाख ७७ हजार, ३८ स्थानिक स्वराज्य संस्थांकडून १ कोटी ३९ लाख, अन्य २५९ ग्राहकांकडून ३ कोटी ८७ लाख मिळून १८ हजार ६२० ग्राहकांकडून १ कोटी ६१ लाख ९९ हजार रूपयांची थकबाकी आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील थकबाकी (लाखामध्ये)ग्राहक संख्याथकबाकीघरगुती३६६५८२६०.२१वाणिज्य४६४५८८.९७औद्योगिक९७९५३.३०कृषिपंप१६६६१०.९७पाणीपुरवठा ६६५४०.७३पथदीप२९७१८.७९अन्य६३६११.६८एकूण४५५४६४८४.६६महावितरण कंपनीने सध्या फिडरनिहाय भारनियमन सुरू केले आहे. ज्या फिडरवर वीजगळती अधिक शिवाय वीजबिल वसुली कमी आहे, त्या फिडरवर भारनियमन करण्यात येते. महावितरणकडून वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
४५ हजार ग्राहक थकबाकीदार!
By admin | Published: February 12, 2015 11:47 PM