सिंधुदुर्ग : गोवा बनावटीच्या मद्यासह ४७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोल्हापूरच्या भरारी पथकाने कारवाई केली. याप्रकरणी सावंतवाडीतील एकास ताब्यात घेण्यात आले.नितीश रमेश तांबोसकर (वय ३३, रा. चराठा, ता. सावंतवाडी) असे या ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे ३६ लाख ६९ हजार रुपयांच्या दारूसह १० लाखाचा टेम्पो असा एकूण ४६ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. जिल्ह्याच्या प्रत्येक सीमेवर कडक तपासणी होत असतानाही इतका मोठ्या प्रमाणात मद्यसाठा कोल्हापूर जिल्ह्यात पोहचलाच कसा असा सवाल उपस्थित करत याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे विभागीय उपआयुक्त बी. एच. तडवी व निरीक्षक. एस. जे. डेरे यांचे आदेशाने दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, कॉन्स्टेबल सर्वश्री पवार, संदिप जानकर, शंकर मोरे, दिपक कापसे, योगेश शेलार यांनी केली पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे करीत आहेत.
गोवा बनावटीच्या मद्यासह ४७ लाखांचा मुद्देमाल जप्त, सावंतवाडीतील एक जण ताब्यात
By अनंत खं.जाधव | Published: September 20, 2022 4:39 PM