शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"भाजपने डॉग स्कॉड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
4
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
6
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
7
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
8
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
9
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
10
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
11
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
12
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
13
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
14
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
15
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
16
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
17
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
18
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
19
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
20
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."

जिल्ह्यात १०७ जागांसाठी ४७३ उमेदवारी अर्ज

By admin | Published: October 30, 2016 12:23 AM

नगरपालिका निवडणूक : नगराध्यक्षपदासाठी २५ जणांचे अर्ज

रत्नागिरी : जिल्ह्यातील चार नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीसाठीच्या १०७ जागांसाठी तब्बल विक्रमी ४७३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याची शनिवार ही शेवटची मुदत असल्याने सर्वच ठिकाणी उमेदवारांची तुडुंब गर्दी झाली होती. चार नगरपरिषदांमध्ये होणाऱ्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीसाठी २५ अर्ज दाखल झाले आहेत.रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या चार नगरपरिषदांची आणि दापोली नगरपंचायतीची निवडणूक २७ नोव्हेंबरला होत आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शनिवार शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच ठिकाणी उमेदवारांची रीघ लागली होती. रत्नागिरीमध्ये नगरसेवकांच्या ३0 जागांसाठी १२0 अर्ज दाखल झाले आहेत. नगराध्यक्ष निवडणुकीसाठी ११ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सर्वाधिक जागा रत्नागिरी नगरपरिषदेतच असल्याने येथील निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे. शिवसेना, भाजप स्वबळावर लढत असून, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आघाडी केली आहे. अर्थात या आघाडीतील जागा वाटपावर अजून अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. रत्नागिरीत जनजागृती संघाने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असून, काही अपक्ष उमेदवार या संघाकडून उभे केले आहेत. (प्रतिनिधी)चिपळूणमध्ये सर्व पक्षांची स्वबळावर लढतचिपळूणमध्ये २६ जागांसाठी ११३ अर्ज दाखल झाले आहेत, तर नगराध्यक्षपदासाठी ५ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची जास्त गर्दी झाल्यामुळे सायंकाळी ७ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचे काम सुरू होते. येथे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे चार पक्ष स्वबळावर लढत आहेत. राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळे यावेळी राष्ट्रवादीतील काही मंडळी शिवसेनेला सहकार्य करत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.नगरसेवकपदासाठी विक्रमी अर्जनगर परिषदजागाअर्जरत्नागिरी३0१२0चिपळूण२६११३खेड१७६३राजापूर१७६९दापोली१७१0८खेडमध्ये नगरसेवकांच्या १७ जागांसाठी ६३ उमेदवारांनी आणि नगराध्यक्षपदासाठी ६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. येथे मनसे आणि राष्ट्रवादीने शहर विकास आघाडी केल्यामुळे शिवसेनेला कडवे आव्हान उभे झाले आहे. भाजप येथेही स्वबळावर लढत आहे. दापोली नगरपंचायतीमध्ये १७ जागांसाठी १0८ अर्ज दाखल झाले आहेत. खेड अणि राजापूरमध्ये अर्जांची संख्या कमी असली तरी दापोलीमध्ये मात्र ही संख्या मोठी आहे.२ नोव्हेंबरला या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. ११ नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.