देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील २९१ पाणी नमुन्यांपैकी ४९ पाणी नमुने दूषित असल्याचे आढळून आले. विहीरीच्या पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पाणी नमुने दूषित मिळून आल्याचे निष्पन्न झाले आहे. हे पाणी नमुने मार्च महिन्यात घेण्यात आले होते. दर महिन्याला हे पाणी नमुने गोळा करण्यात येतात. पाणीटंचाईच्या काळात प्रदूषित पाणीनमुन्यांची संख्या वाढते. संगमेश्वर तालुक्यातील २९१ पाणी नमुने तपासले असता, यातील ४९ पाणी नमुने दूषित असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे पाणी नमुने दर महिन्याला आरोग्य विभागामार्फत तपासणीसाठी जिल्हा यंत्रणेकडे पाठविण्यात येतात. या दूषित नमुन्यांमध्ये बुरंबी केंद्रातील करंबेळे फौजदारवाडी सार्वजनिक बोअरवेल, बौध्दवाडी येथील सार्वजनिक विहीर, मुचरी बौध्दवाडी बोअरवेल, मुचरी मोहल्ला सार्वजनिक नळ, देवळे केंद्र्रातील मेघी वाणीवाडी सार्वजनिक नळ, तिवरे वरचीवाडी सार्वजनिक विहीर, दाभोळे धनगरवाडी व बौध्दवाडी सार्वजनिक नळ, करंजारी धनगरवाडी, चाफवली रावणंगवाडी येथील सार्वजनिक विहीर, धामापुर तर्फे देवरूख केंद्रातील ताम्हाने कुळ्येवाडी, किरडुवे, कोंढ्रण, आंबवली धनगरवाडी सार्वजनिक नळ, तुळसणी राऊळवाडी २, तुळसणी बौध्दवाडी ३, मराठवाडी,मोहल्ला, कुंभारवाडी, बेर्डेवाडी, वाशी धारेचीवाडी, आंबवली मधलीवाडी, याच गावातील भेरेवाडीचा समावेश आहे.कडवई केंद्र्रातील राजवाडी मांजरेकरवाडी, तुरळ गुरववाडी, शेंबवणे बौध्दवाडी, कडवई उजगावकरवाडी व मादगेवाडी येथील सार्वजनिक विहिरी, तुरळ सांगडेवाडी बोअरवेल व हरेकरवाडी नळपाणी योजना, कोंड उमरे केंद्र्रातील कारभाटले हेदली येथील इंदुलकरवाडी सार्वजनिक विहीर नळपाणी योजना, खुटेवाडी, बौध्दवाडी सार्वजनिक विहीर, कळंबस्ते भेकरेवाडी सार्वजनिक विहीर. निवे खुर्द केंद्र्रातील मारळ निवधे चव्हाणवाडी व गुरववाडी सार्वजनिक बोअरवेल. फुणगूस केंद्र्रातील पोचरी धनगरवाडी व धामणेवाडी सार्वजनिक नळ, असुर्डे कुळ्येवाडी सार्वजनिक विहीर, आंबेड बुदु्रक मोहल्ला येथील बोअरवेल व नळपाणी योजना, याच गावातील सोलकरवाडी विहीर, डिंगणी प्रिंदवणे भालेकरवाडी सार्वजनिक नळ या स्त्रोतांचा समावेश आहे.या बरोबरच सायले केंद्र्रातील काटवली पड्याळवाडी सार्वजनिक ३ विहिरी व राईनवाडीतील १ सार्वजनिक विहीर असे पाणी नमुने दूषित मिळून आले आहेत. तालुक्यातील ११ प्राथमिक आरोग्य केंदातून हे पाणी नमुने गोळा करण्यात आले होते. यातील एकही पाणी नमुना दूषित नसल्याचे मिळून आले आहे. दूषित पाणी नमुन्याबाबत काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)विविध ठिकाणी पाणी दुषित आढळून आले आहेत. सायले केंद्र्रातील काटवली पड्याळवाडी सार्वजनिक ३ विहिरी व राईनवाडीतील १ सार्वजनिक विहीर असे पाणी नमुने दुषित असल्याचे या तपासणीत आढळून आले.संगमेश्वर तालुक्यात असलेल्या ११ प्राथमिक आरोग्य केंदातून हे पाणी नमुने गोळा करण्यात आले होते. यातील एकही पाणी नमुना दूषित नसल्याचे मिळून आले आहे, असे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले.केंद्रदूषित संख्याबुरंबी३२ नमुन्यांमधील ४देवळे३३ पैकी ७धामापुर तर्फे ४४पैकी १५देवरूखकडवई३० पैकी ७कोंडउमरे१५ पैक ी ४निवे खुर्द२२ पैकी २फुणगुस२२ पैकी ६सायले१९ पैकी ४माखजन२३साखरपा२५वांद्री २३
संगमेश्वरात ४९ पाणीनमुन्यांवर ‘दूषित’चा शिक्का
By admin | Published: April 29, 2015 10:09 PM