शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
2
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
3
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
4
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
7
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
8
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
9
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
10
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
11
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
13
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
14
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
15
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
16
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
17
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
19
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस

५० वर्षांपूर्वीच्या अपघाताच्या आठवणी होणार जाग्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2018 10:51 PM

कणकवली : भजनाच्या माध्यमातून हरिनामाचा गजर करण्यासाठी ट्रकमधून निघालेल्या भजनप्रेमींवर ५० वर्षांपूर्वी गडनदी पुलावर काळाने घाला घातला होता. यावेळी झालेल्या भीषण अपघातात ५५ माणसे दगावली होती. तर काही माणसे जखमी झाली होती. दगावलेल्या व्यक्तींमध्ये कणकवली तेलीआळीतील ४० जणांचा समावेश होता. या मृतात्म्यांना आदरांजली वाहण्याबरोबरच त्या अपघातावेळी जे मदतीचे हात पुढे ...

कणकवली : भजनाच्या माध्यमातून हरिनामाचा गजर करण्यासाठी ट्रकमधून निघालेल्या भजनप्रेमींवर ५० वर्षांपूर्वी गडनदी पुलावर काळाने घाला घातला होता. यावेळी झालेल्या भीषण अपघातात ५५ माणसे दगावली होती. तर काही माणसे जखमी झाली होती. दगावलेल्या व्यक्तींमध्ये कणकवली तेलीआळीतील ४० जणांचा समावेश होता. या मृतात्म्यांना आदरांजली वाहण्याबरोबरच त्या अपघातावेळी जे मदतीचे हात पुढे आले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुदर्शन मित्रमंडळ तसेच कणकवलीवासीयांतर्फे सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.२१ सप्टेंबर १९६८ रोजी शनिवारी सर्वपित्री अमावास्या होती. या दिवशी कणकवली शहर तसेच परिसरातील १२० भजनप्रेमी मालवण भरड दत्त मंदिर येथील डबलबारी सामन्याला निघाले होते. भजन महर्षी अर्जुन तावडे बुवा व परशुराम सावंत बुवा यांच्यात हा सामना होता. कणकवली तेलीआळी तसेच हर्णेआळी येथून भजनप्रेमींना घेऊन ट्रक मालवणला निघाला होता.कणकवली व वागदे गावच्या सीमेवर गडनदी पुलावरील वळणावर ट्रकचालकाचा अंदाज चुकला. त्यामुळे तो ट्रक नदीत कोसळला. सर्वपित्री अमावास्येच्या काळरात्री भजनप्रेमींवर काळाने घाला घातला. अपघातात सुमारे ५१ जण जागीच ठार झाले होते. अनेक घरातील कर्ती-सवरती माणसे मृत झाली होती. या घटनेची माहिती कणकवलीसह जिल्हाभर अल्पावधीतच पोहोचली. या संकटसमयी अनेक व्यक्ती मदतीला धावल्या. डॉक्टरांनी जखमींना वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. काही जखमींना सावंतवाडी व वेंगुर्ले येथेही उपचारासाठी पाठविण्यात आले. हा धक्का सहन करण्यासारखा नव्हता.या अपघातातील मृतात्म्यांच्या आठवणी गेली ५० वर्षे त्यांचे कुटुंबीय तसेच कणकवलीवासीय सुदर्शन मित्रमंडळाच्या पुढाकारातून जतन करीत आहेत.आज डबलबारी भजनाचा कार्यक्रमसर्वपित्री अमावास्येच्या दिवशी तेलीआळी येथे कणकवलीवासीय एकत्र येतात. भजनाच्या माध्यमातून मृत व्यक्तिंना आदरांजली वाहिली जाते. या अपघाताला यावर्षी ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे मृतात्म्यांना आदरांजली वाहण्यासाठी सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अपघाताच्या वेळी ज्यांनी मदतीचा हात दिला त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे. तसेच भजनही होणार आहे. त्यानंतर आमने-सामने डबलबारी भजनाचा कार्यक्रम होणार आहे. पोखरण येथील बुवा समीर कदम व लिंगडाळ येथील बुवा संदीप लोके यांच्यात हा सामना रंगणार आहे. याबाबत तेलीआळी येथील सुदर्शन मित्रमंडळाचे कार्यकर्ते बुजुर्ग व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली गेले काही दिवस नियोजन करीत आहेत.